(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bank Recruitment 2022 : बँकेत नोकरीची उत्तम संधी, पदवीधरांनी आजच अर्ज करावा, जाणून घ्या सविस्तर
Bank Recruitment 2022 : अर्ज करण्याची प्रक्रिया केवळ 9 मे पर्यंतच असणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी आजच अर्ज करावा.
Bank Recruitment 2022 : जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात नोकरी करायची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) ने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली होती. ज्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया केवळ 9 मे पर्यंतच म्हणजेच फक्त आजपर्यंतच असणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा. उमेदवार IPPB ippbonline.com च्या अधिकृत साइटला भेट देऊन देखील अर्ज करू शकतात. जाणून घ्या सविस्तर माहिती..
एकूण 12 पदे भरली जाणार
बॅंकेकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीद्वारे व्यवस्थापकाची एकूण 12 पदे भरली जाणार आहेत. ज्यामध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, AGM, मुख्य व्यवस्थापक (डिजिटल तंत्रज्ञान), वरिष्ठ व्यवस्थापक (सिस्टम/डेटाबेस), वरिष्ठ व्यवस्थापक (सुरक्षा प्रशासन) ही पदे आहेत.
शैक्षणिक पात्रता
अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे.
अर्ज फी
या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या SC/ST/PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 150 रुपये ठेवण्यात आले आहे, तर इतर श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रुपये 750 आहे. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी भरतीशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या अधिक माहितीसाठी अधिकृत साइटची मदत घ्यावी.
याप्रमाणे करा अर्ज
1: उमेदवारांनी सर्वप्रथम इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड ippbonline.com च्या अधिकृत साइटला भेट द्यावी.
2: मुख्यपृष्ठावर, करिअर टॅबवर क्लिक करा.
3: आता जाहिरातीखाली दिलेल्या अर्ज लिंकवर क्लिक करा.
4: त्यानंतर स्वतःबाबत नोंदणी करा.
5: आता उमेदवार त्यांचा अर्ज भरतात.
6: त्यानंतर उमेदवार अर्ज फी भरतील.
7: आता अर्ज सबमिट करा.
8: शेवटी, उमेदवारांनी अंतिम पृष्ठाची प्रिंट आउट घ्यावी.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या इतर बातम्या :
-
ONGC Recruitment 2022 : ONGC मध्ये बंपर भरती; संधी सोडू नका, लगेचच करा अर्ज
-
PNB Recruitment 2022 : पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, आज अर्ज करण्याची शेवटची तारीख
- IOCL Recruitment 2022 : पदवीधरांसाठी महत्त्वाची बातमी; प्रति माह 50 हजार कमावण्याची संधी, कसा कराल अर्ज?