सरकारी नोकरीची मोठी संधी! अग्निशामक दलात मोठी भरती, कधी कुठे कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. अग्निशामक दलात विविध पदांसाठी भरती निघाली आहे.

Fire Brigade job News : सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमध्ये अग्निशमाक आणि आपत्कालीन सेवा विभागाने एकूण 295 पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे अग्निशामक विभागात स्टेशन ऑफिसर, फायर मॅन, ड्रायव्हर, स्टोअर कीपर, मेकॅनिक अशा विविध पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवार 1 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी, विभागाच्या अधिकृत वेबसाइट cghgcd.gov.in ला भेट द्यावी लागेल.
कोणात्या जागेसाठी किती पदे?
स्टेशन ऑफिसर (सब इन्स्पेक्टर): 21 पदे
वाहन चालक: 14 पदे
वाहन चालक कम ऑपरेटर: 86 पदे
फायरमन: 117 पदे
स्टोअर कीपर: 32 पदे
मेकॅनिक: 2 पदे
वॉचरूम ऑपरेटर: 19 पदे
वायरलेस ऑपरेटर (कंत्राट): 4 पदे
उमेदवारांकडे पात्रता काय असावी?
प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. स्टेशन ऑफिसरसाठी बीएससी किंवा बीई (फायर फायटिंग विषय) आवश्यक आहे. ड्रायव्हर/ऑपरेटरसाठी 12 वी उत्तीर्ण आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. फायरमन आणि स्टोअर कीपरसाठी 12 वी उत्तीर्ण, मेकॅनिकसाठी 12 वी उत्तीर्ण आणि आयटीआय डिझेल मेकॅनिकमध्ये डिप्लोमा आवश्यक आहे. वॉचरुम आणि वायरलेस ऑपरेटर 12 वी उत्तीर्ण आणि नगर सैनिक म्हणून प्रशिक्षण आवश्यक आहे.
वयोमर्यादा किती? कशी होणार निवड प्रक्रिया
उमेदवारांचे वय 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर राखीव श्रेणींना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट दिली जाईल. सर्व पदांसाठी केवळ शैक्षणिक पात्रताच नाही तर शारीरिक कार्यक्षमता चाचणी देखील आवश्यक असेल. उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल.
कसा कराल अर्ज?
सर्वप्रथम छत्तीसगड अग्निशामक आणि आपत्कालीन सेवा विभागाच्या अधिकृत वेबसाइट - cghgcd.gov.in वर जा.
होमपेजवरील भरती 2025 विभागात जा आणि संबंधित भरती अधिसूचनेवर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी, संपूर्ण भरती सूचना काळजीपूर्वक वाचा - जसे की पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा इ.
जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल, तर “नवीन नोंदणी” वर क्लिक करा आणि तुमची मूलभूत माहिती - नाव, मोबाईल नंबर, ईमेल इत्यादी भरा.
नोंदणीनंतर, मिळालेल्या लॉगिन आयडी आणि पासवर्डने लॉग इन करा आणि संपूर्ण अर्ज फॉर्म भरा.
फोटो, स्वाक्षरी, १०वी/१२वीची गुणपत्रिका, ड्रायव्हिंग लायसन्स (लागू असल्यास) इत्यादी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
अर्ज शुल्क असल्यास, ऑनलाइन पद्धतीने (डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग) भरा.
सर्व माहिती भरल्यानंतर आणि शुल्क भरल्यानंतर, “सबमिट” बटणावर क्लिक करा.
भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रत डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट ठेवा.
महत्वाच्या बातम्या:
बँकेत नोकरीची मोठी संधी, विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे करालं अर्ज?
























