बँकेत नोकरीची मोठी संधी, विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे करालं अर्ज?
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आली आहे. इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने स्थानिक बँक अधिकाऱ्यांच्या एकूण 400 पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

Bank Job News : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आली आहे. इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने स्थानिक बँक अधिकाऱ्यांच्या एकूण 400 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज कर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अर्ज करण्यासाठी, अधिकृत वेबसाइट iob.in ला भेट द्यावी. या वेबसाईटवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
कोणकोणत्या राज्यात उमेदवारांची भरती केली जाणार
या भरतीद्वारे, वेगवेगळ्या राज्यात नियुक्त्या केल्या जातील. बहुतेक भरती तामिळनाडूमध्ये केल्या जातील. याशिवाय, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब आणि ओडिशा सारख्या राज्यांमध्ये देखील पदे उपलब्ध आहेत. या भरतीत सामील होण्यासाठी, उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाले तर, उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे निश्चित केले आहे. राखीव श्रेणींना सरकारी नियमांनुसार वरच्या वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
अर्ज करण्यासाठी किती फी भरावी लागणार?
अर्ज शुल्काबद्दल बोलायचे झाले तर, सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी आणि दिव्यांग (पीएच) श्रेणीतील उमेदवारांना फक्त 175 रुपये शुल्क भरावे लागेल.
निवड कशी केली जाणार?
उमेदवारांची निवड तीन टप्प्यात केली जाईल. प्रथम एक ऑनलाइन लेखी परीक्षा असेल, ज्यामध्ये एकूण 140 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील आणि परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असेल. त्यानंतर भाषा प्रवीणता चाचणी आणि वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. उत्तीर्ण गुण सामान्य श्रेणीसाठी 35 टक्के आणि राखीव श्रेणींसाठी 30 टक्के निश्चित केले आहे. चुकीचे उत्तर दिल्याबद्दल एक चतुर्थांश (1/4) गुण वजा केले जातील.
पगार किती मिळणार?
पगाराबद्दल बोलायचे झाले तर, निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 4880 ते 85920 रुपये पगार मिळेल. यासोबतच, बँकेच्या नियमांनुसार इतर भत्ते आणि सुविधा देखील दिल्या जातील.
कसा कराल अर्ज?
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट iob.in वर जा. तेथील भरती विभागात जा आणि संबंधित भरती अधिसूचनेवर क्लिक करा. नोंदणी केल्यानंतर, अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. शेवटी शुल्क भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
दरम्यान, जे उमेदवार पात्र आहेत, त्यांना तातडीने या भरतीसाठी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. जागांबद्दल अधिकची माहिती अधिकृत वेबसाइट iob.in वर देण्यात आली आहे. या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही सविस्तर माहिती वाचू शकता.


















