ESIC Recruitment 2022 : ESIC कडून 400 हून अधिक पदांवर भरती जाहीर;18 जुलै शेवटची तारीख, कसा कराल अर्ज?
ESIC Recruitment 2022 : एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC) ने फॅकल्टीच्या (ESIC भर्ती 2022) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. जाणून घ्या पद्धत...
ESIC Recruitment 2022 : सरकारी नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने प्राध्यापक पदांसाठी (ESIC Recruitment 2022) अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ESIC ची अधिकृत वेबसाइट esic.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2022 आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 491 पदांची भरती करण्यात येणार आहे.
भरती प्रक्रियेतील महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जुलै 2022
भरती प्रक्रियेतील पदांची संख्या
एकूण पदांची संख्या : 491
अर्ज फी
इतर सर्व श्रेणींसाठी अर्ज शुल्क 500 रुपये आहे. SC/ST/PWD/विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक यांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
पगार आणि पदांची संख्या जाणून घ्या
400 हून अधिक रिक्त पदांवर होणार्या भरती प्रक्रियेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी 197 पदं, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 82 पदं, एसटी प्रवर्गासाठी 41 पदं, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 126 पदं, प्रवर्गासाठी 45 पदं आहेत. या पदांवरील निवडलेल्या उमेदवारांना वेतन मॅट्रिक्स स्तर 11 अंतर्गत 67700 रुपये ते 208700 रुपये प्रति महिना वेतन दिलं जाईल.
या पत्त्यावर अर्ज पाठवा
उमेदवारांनी भरलेला अर्ज प्रादेशिक संचालक, ESI कॉर्पोरेशन, पंचदीप भवन, सेक्टर-16 (लक्ष्मी नारायण मंदिराजवळ), फरिदाबाद-121002, हरियाणा येथे शेवटच्या तारखेपूर्वी पाठवावा.
उमेदवारांची निवड कशी केली जाईल?
निवड मंडळाद्वारे घेतलेल्या मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. ESIC ने ठरवल्यानुसार, या पदांसाठी मुलाखत योग्य ठिकाणी घेतली जाईल.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :