![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Eastern Railway Vacancy 2022 : आता परीक्षेशिवाय मिळवा रेल्वेत नोकरी; कसा कराल अर्ज, जाणून घ्या तपशील
Eastern Railway Vacancy 2022 : पूर्व रेल्वेनं अप्रेंटिसच्या पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. या नोकऱ्या अनेक विभागांत विभागल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 2972 पदांची भरती करणार आहे.
![Eastern Railway Vacancy 2022 : आता परीक्षेशिवाय मिळवा रेल्वेत नोकरी; कसा कराल अर्ज, जाणून घ्या तपशील Eastern Railway Vacancy 2022 for posts of apprentice these jobs are divided under several divisions Eastern Railway Vacancy 2022 : आता परीक्षेशिवाय मिळवा रेल्वेत नोकरी; कसा कराल अर्ज, जाणून घ्या तपशील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/25/ea485c94c7460324fe0e16ac58c276ba_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Eastern Railway Vacancy 2022 : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दरवर्षी लाखो तरुण रेल्वेत नोकरी मिळविण्याच्या तयारीत रात्रंदिवस व्यस्त असतात आणि ते रिक्त पदाची आतुरतेनं वाट पाहत असतात. पूर्व रेल्वेनं अप्रेंटिसच्या पदांसाठी बंपर रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या नोकऱ्या अनेक विभागांत विभागल्या जातात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 2972 पदांची भरती केली जाणार आहे.
जर तुम्ही रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर आरआरसीच्या अधिकृत वेबसाइट rrcer.com वर जाऊन भरतीचा अर्ज भरू शकता. अर्ज 11 एप्रिल 2022 पासून स्विकारले जातील, तर अर्स करण्यासाठीची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान 50 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डाचं दहावी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तर इतर पदांसाठी संबंधित ट्रेडमध्ये आठवी पास असलेले राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सर्व तपशील तपासावेत असं आवाहन भारतीय रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
निवड प्रक्रिया
भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. या पदांवर उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारावर करण्यात येईल. पूर्व रेल्वे अंतर्गत निवड करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थींना निकषांनुसार मासिक वेतन दिलं जाईल. तुम्हीही रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Indian Railway Recruitment 2022 : भारतीय रेल्वेच्या 'या' विभागासाठी मेगा भरती; अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
- Indian Railway : जर तुम्हाला रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर व्हायचे असेल, तर या बातमीवर क्लिक करा, सर्व माहिती मिळेल
- Railway Recruitment 2022 : पश्चिम रेल्वेत मोठी भरती! थेट मुलाखतीतून होणार निवड, लवकरात लवकर अर्ज करा
- Railway Recruitment : पदवीधर किंवा 12वी पास असाल तर रेल्वेमध्ये अर्ज करा, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख, पगार
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)