(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indian Railway Recruitment 2022 : भारतीय रेल्वेच्या 'या' विभागासाठी मेगा भरती; अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
Indian Railway Recruitment 2022 : भारतीय रेल्वेनं ज्युनियर टेक्निकल असोसिएटच्या पदांवर भरतीसाठी नोटीस जारी केली आहे.
Indian Railway Recruitment 2022 : जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल आणि रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच. उत्तर मध्य रेल्वेनं भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी जेटीए (JTA) म्हणजेच, स्थापत्य अभियांत्रिकी विभागांसाठी ज्युनियर टेक्निकल असोसिएटच्या पदांवर भरतीसाठी नोटीस जारी केली आहे.
ज्युनियर टेक्निकल असोसिएटसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांमधून सर्वप्रथम अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा किंवा पदवी आणि GATE स्कोअर असलेल्या उमेदवारांची निवड केली जाईल. आणि त्यानंतर B.Tech उमेदवार आणि नंतर डिप्लोमा उमेदवार निवडले जातील.
भरतीशी निगडीत महत्त्वाच्या तिथी :
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 08 एप्रिल 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2022
भारतीय रेल्वेनं जारी केलेल्या या भरतीअंतर्गत 8 पदांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी 8 पदं, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 पदं, एससी उमेदवारांसाठी 3 पदं, एसटीसाठी 2 आणि ईडब्ल्यूएससाठी 2 पदं निश्चित करण्यात आली आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल) पदांसाठी निवडलेल्या 'झेड' वर्गातील उमेदवारांना दरमहा 25,000 रुपये, 'व्हाय' वर्गासाठी प्रति महिना 27,000 रुपये आणि 'एक्स' वर्गातील निवडलेल्या उमेदवारांना 30,000 रुपये वेतन प्रति माह देण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 33 वर्ष दरम्यान असावं.
कसा कराल अर्ज?
- सर्वात आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट http://www.rrcpryj.org वर भेट द्या.
- त्यानंतर भरतीसाठी देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.
- रजिस्ट्रेशनवर क्लिक करा.
- आपला अर्ज दाखल करा.
- सर्वात शेवटी अर्ज शुल्क भरा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Indian Railway : जर तुम्हाला रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर व्हायचे असेल, तर या बातमीवर क्लिक करा, सर्व माहिती मिळेल
- Railway Recruitment : पदवीधर किंवा 12वी पास असाल तर रेल्वेमध्ये अर्ज करा, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख, पगार
- नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बंपर भरती; प्रतिमाह 1 लाख 75 हजार वेतन मिळवण्याची संधी
- SECL Recruitment 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी, जाणून घ्या कुठे करता येणार अर्ज
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI