दरम्यान, आज सकाळी 11 वाजता लिमखेडा इथं वनबंधू कल्याण योजनेअंतर्गत अनेक योजनांचा शुभारंभ मोदींच्या हस्ते होणार आहे. तर दुपारी 2 वाजताच्या सुमारास नवसारीत मोदींच्याच हस्ते 11 हजार 200 दिव्यांगांना वेगवेगळ्या उपकरणांचं वाटप केलं जाणार आहे.
2/5
याशिवाय 2200 जणांना श्रवणयंत्र आणि 1200 व्हील चेअर वाटप करण्यात येणार आहे.
3/5
पंतप्रधानांच्या 66 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमिद अंसारी यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या. मोदींनी त्यांचे ट्विटरच्या माध्यमतून आभार मानले.
4/5
पंतप्रधानांनी आईचा आशीर्वाद घेतानाचे फोटो ट्वीट केला आहेत.
5/5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 66वा वाढदिवस आहे. मोदी आपला वाढदिवस गुजरातमध्ये साजरा करणार आहेत. त्यामुळं गुजरातमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी मोदींनी गांधीनगरमधील रायसण इथं जाऊन आई हिराबा यांचा आर्शीवाद घेतला.