एक्स्प्लोर

Loksabha Election 2019 7th phase : दुपारी 2 वाजेपर्यंत 41.41 टक्के मतदान

LIVE

Loksabha Election 2019 7th phase : दुपारी 2 वाजेपर्यंत 41.41 टक्के मतदान

Background

नवी दिल्ली : लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. सातव्या टप्प्यात एकूणण 59 जागांवह हे मतदान होत असून एकूण 918 उमेदवारांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे.

सातव्या टप्प्यात सात राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान होत आहे. यामध्ये बिहारमध्ये 8, हिमाचल प्रदेशमध्ये 4, झारखंड 3, मध्य प्रदेशात 8, पंजाब 13, उत्तर प्रदेश 13, पश्चिम बंगाल 9 तर चंदीगड एका जागेवर मतदान पार पडणार आहे. सुमारे दहा कोटी मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

आज वाराणसीमध्येही मतदान होणार आहे, याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या सामना काँग्रेसच्या अजय राय, एसपी-बीएसपी-आरएलडी महाआघाडीच्या शालिनी यादव यांच्याशी होणार आहे. याठिकाणी एकूण 25 उमेदवार आपलं नशिब आजमावत आहेत.

सातव्या टप्प्यातील 'स्टार वॉर'

बिहारच्या पटना साहिब मतदारसंघातून अभिनेते शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसच्या तिकीटीवर मैदानात असून त्यांच्यासमोर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचं आव्हान असणार आहे. पंजाबच्या गुरूदासपूरमधून अभिनेता सनी देओलला भाजपने उमेदवारी दिली आहे. सनी देओलच्या विरोधात काँग्रेसकडून विद्यमान खासदार सुनील जाखड मैदानात आहेत. चंदीगडमधून भाजपच्या विद्यमान खासदार किरण खेर आणि काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री पवन कुमार बन्सल यांच्यामध्ये सामना होणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये 9 जागांसाठी मतदान

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये 9 जागांवर मतदान होत आहे. कोलकाता उत्तर आणि कोलकात दक्षिण दमदम, बारासात, बशीरहाट, जाधवपूर, डायमंड हार्बर, जयनगर आणि मथुरापूर या नऊ मतदार संघात एकूण 111 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

14:50 PM (IST)  •  19 May 2019

लोकसभा निवडणूक, सातवा टप्पा : 2 वाजेपर्यंत 41.41 टक्के मतदान ▪️बिहार - 36.20 टक्के ▪️हिमाचल प्रदेश - 43.68 टक्के ▪️मध्य प्रदेश - 46.03 टक्के ▪️पंजाब - 37.89 टक्के ▪️उत्तर प्रदेश - 37.00 टक्के ▪️पश्चिम बंगाल - 49.79 टक्के ▪️झारखंड - 52.89 टक्के ▪️चंदीगड - 37.50 टक्के
12:16 PM (IST)  •  19 May 2019

लोकसभा निवडणूक, सातवा टप्पा : 12 वाजेपर्यंत 25.47 टक्के मतदान ▪️बिहार - 18.90 टक्के ▪️हिमाचल प्रदेश - 27.62 टक्के ▪️मध्य प्रदेश - 29.48 टक्के ▪️पंजाब - 23.45 टक्के ▪️उत्तर प्रदेश - 23.16 टक्के ▪️पश्चिम बंगाल - 32.15 टक्के ▪️झारखंड - 31.39 टक्के ▪️चंदीगड - 22.30 टक्के
11:40 AM (IST)  •  19 May 2019

पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना, भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद
11:21 AM (IST)  •  19 May 2019

लोकसभा निवडणूक, सातवा टप्पा : 11 वाजेपर्यंत 10.46 टक्के मतदान ▪️बिहार - 17.94 टक्के ▪️हिमाचल प्रदेश - 15.66 टक्के ▪️मध्य प्रदेश - 16.28 टक्के ▪️पंजाब - 15.65 टक्के ▪️उत्तर प्रदेश - 14.43 टक्के ▪️पश्चिम बंगाल - 21.11 टक्के ▪️झारखंड - 23.86 टक्के ▪️चंदीगड- 10.40 टक्के
09:44 AM (IST)  •  19 May 2019

लोकसभा निवडणूक, सातव्या टप्प्यातील मतदान, 9 वाजेपर्यंत 10.46 टक्के मतदान ▪️बिहार - 10.65 टक्के ▪️हिमाचल प्रदेश - 2.80 टक्के ▪️मध्य प्रदेश - 11.63 टक्के ▪️पंजाब - 9.67 टक्के ▪️उत्तर प्रदेश - 7.41 टक्के ▪️पश्चिम बंगाल - 14.11 टक्के ▪️झारखंड - 15.16 टक्के ▪️चंदीगड- 10.40 टक्के
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP MajhaRahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Embed widget