एक्स्प्लोर
B-Day Special : भाजपच्या भीष्माचार्यांचं 90 व्या वर्षात पदार्पण
1/11

भारतीय जनता पक्षाचा इतिहास लालकृष्ण अडवाणींच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होण्यासारखा नाही. जनसंघ ते भाजपच्या प्रवासात त्यांनी अनेक स्थित्यंतरं पाहिली. जनता पार्टीचं सरकार बरखास्त झाल्यानंतर, स्थापन झालेल्या भाजपला एका वेगळ्या उंचीपर्यंत पोहचवण्याचं काम लालकृष्ण अडवाणी यांनी केलं. सध्या मोदी युगामुळे अडवाणी युग झाकोळलं गेलं असलं, तरी त्यांना भाजपचे भीष्माचार्य म्हणून आजही ओळखलं जातं. आज भाजपच्या या भीष्माचार्यांचा 90 वा वाढदिवस आहे.
2/11

राम मंदिर आंदोलनामुळे देशात सर्वात लोकप्रिय झालेल्या अडवाणींवर संघ परिवाराचाही वरदहस्त होता. तिसऱ्या अघाडीच्या सरकारमधील दुफळीमुळे 1998 मध्ये वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सत्तेत आलं. यावेळी अडवाणींनी पंतप्रधान पदासाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाची घोषणा केली. वास्तविक, त्यावेळी अडवाणींना पंतप्रधान होण्याची संधी होती. पण त्यांनी स्वत: हून वाजपेयींच्या नावाची घोषणा केल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
Published at : 08 Nov 2017 12:32 PM (IST)
View More























