Yuzvendra Chahal and Dhanashree Varma Divorced: "आजपासून दोघेही पती-पत्नी नाहीत..."; वांद्र्यातील फॅमिली कोर्टात युजवेंद्र चहल, धनश्री वर्माचा घटस्फोट, युझीनं किती पोटगी दिली?
Yuzvendra Chahal and Dhanashree Varma Divorced: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. अशातच या बातमीनं दोघांच्याही चाहत्यांना फार वाईट वाटलं आहे, तशा प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

Yuzvendra Chahal and Dhanashree Varma Divorced: भारतीय क्रिकेट संघाचा (India National Cricket Team) स्टार क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Varma) यांचा घटस्फोट (Divorce) झाला आहे. या जोडप्यानं आज मुंबई फॅमिली कोर्टात घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. अशातच या बातमीनं दोघांच्याही चाहत्यांना फार वाईट वाटलं आहे, तशा प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
धनश्री-युजवेंद्र यांचा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट
धनश्री-युजवेंद्र यांचा अखेर घटस्फोट झाल्याची माहिती वांद्रे फॅमिली कोर्टात उपस्थित असलेल्या एका वकिलानं एबीपी न्यूजला दिली. त्यांनी सांगितलं की, घटस्फोटाच्या अंतिम सुनावणीसाठी आणि सर्व औपटारिकता पूर्ण करण्यासाठी दोघेही सकाळी 11 वाजता वांद्रे येथील फॅमिली कोर्टात उपस्थित होते. न्यायाधीशांनी दोघांनाही काउन्सिलरकडे पाठवलं. दोघांचंही हे सेशन तब्बल 45 मिनिटं सुरू होतं. अखेर न्यायालयानं दोघांच्याही घटस्फोटाला मान्यता दिल्याची माहिती मिळत आहे.
18 महिन्यांपासून राहत होते विभक्त
वकिलांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, धनश्री आणि युजवेंद्र दोघांनीही न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात म्हटलं की, दोघेही परस्पर संमतीनं घटस्फोट घेत आहेत. दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात, दोघांनीही न्यायाधीशांना सांगितलं की, ते 18 महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. दरम्यान, परस्पर संमतीनं घटस्फोट घेतल्यास, जोडप्याला किमान एक वर्ष एकमेकांपासून दूर राहावं लागतं, जे अशा प्रकरणांमध्ये घटस्फोटाचा आधार बनतं.
कम्पॅटिबिलिटी संबंधित मुद्द्यांच्या कारणांमुळे घटस्फोट
याव्यतिरिक्त धनश्री आणि युजवेंद्र यांना न्यायाधीशांनी वेगळं होण्याची कारणं विचारल्यानंतर कम्पॅटिबिलिटी संबंधित मुद्यांमुळे एकमेककांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. ज्यानंतर न्यायाधीशांनी आपला निर्णय सांगताना म्हटलं की, न्यायालयाकडून हे निर्देश दिले जातात की, आजपासून दोघेही पती-पत्नी नाहीत. न्यायाधीशांनी वांद्र्यातील फॅमिली कोर्टानं हा निर्णय संध्याकाळी 4.30 वाजता सांगितला.
युझीनं किती पोटगी दिली?
युजवेंद्र चहलनं आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्यापासूनच धनश्रीनं मागितलेल्या पोटगीच्या चर्चाही होऊ लागल्या होत्या. धनश्री वर्मानं युजवेंद्र चहलकडे तब्बल 60 कोटी रुपयांची पोटगी मागितल्याचं सांगितलं जात होतं. अशातच आता दोघांच्या घटस्फोटाची माहिती एका वकिलांनी एबीपी न्यूजला दिल्यामुळे पोटगी किती दिली असा प्रश्नही उपस्थित होत आहे. पण, घटस्फोटावेळी पोटगीची रक्कम किती ठरली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, चार वर्षांपूर्वी युजवेंद्र आणि धनश्री वर्मानं एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांनीही लव्ह मॅरेज केलं होतं. आणि गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील मतभेदाच्या बातम्या समोर येत होत्या. पण, तरीसुद्धा या जोडप्यानं याबद्दल कधीही उघडपणे बोललं नाही किंवा चर्चाही केलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
