चित्रिकरण बंद करणारे हे कोण? चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर यांचा सवाल
सध्या सगळेच कलाकार आर्थित विवंचनेत आहेत. मालिकांची चित्रिकरणं सुरू झाली आहेत. पण सिनेमाची चित्रकरणं अद्याप सुरूही झालेली नाहीत. बजेट्स कमी झालेली आहेत. असं असताना महामंडळाच्या अध्यक्षांनी कलाकार, निर्माते यांची बाजू लावून धरणं अपेक्षित आहे. तसं न करता थेट चित्रकरण बंद करण्याची भाषा करणे हे नकारात्मक वातावरण पसरवण्यासारखं आहे.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळ हा ट्रस्ट आहे. ही कोणतीही संघटना नाही. अशावेळी चित्रिकरण करताना जर कोव्हिडबद्दलची नियमावली पाळली गेली नाही तर पोलिसांची मदत घेऊन आम्ही ते चित्रिकरण बंद करू असं धमकावणं निश्चित चूक आहे, असा स्पष्ट खुलासा महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि अभिनेते विजय पाटकर यांनी एबीपी माझाकडे केला आहे. आशालता वाबगांवकर यांच्या निधनानंतर राज्य सरकारने घालून दिलेल्या नियम अटींचं पालन करणं सक्तीचं आहे असं सांगत, तसं झालं नाही तर चित्रकरण बंद करू असा इशारा महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिला आहे.
'मला सगळे कुरुप म्हणायचे' , सुहाना खानने इन्स्टावर व्यक्त केली भावना
पोलिसांच्या मदतीने चित्रिकरण बंद करू यावर बोलताना पाटकर म्हणाले, 'महामंडळाच्या अध्यक्षांची ही भाषा अत्यंत चुकीची आहे. महामंडळाचा नेता या नात्याने त्याने सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. नियम पाळण्याबाबत सर्व चित्रकरण करणाऱ्या निर्मात्यांना समजावलं पाहिजे. तसा आग्रह धरला पाहिजे. जवळपास चार महिन्यानंतर चित्रिकरणं सुरू झाली आहेत. आशालता यांचं जाणं दुर्दैवी आहेच. पण ते कुणी जाणून बुजून केलेलं नाही. सध्या ज्या मालिकांची चित्रिकरणं सुरू आहेत, त्या सर्व सेटवर निर्माते काळजी घेताना दिसत आहेतच. कारण इथे प्रत्येकाला आपला जीव आणि आपली मालिका प्रिय आहे. अशावेळी पोलिसांचं नाव घेऊन धमकीवजा इशारा देणं हे अशोभनीय आहे'
कोरोनाची भीती सगळ्यांनाच आहे.. अनेक सेटवर त्याची काळजी घेतली जाते आहेच असं सांगून ते म्हणाले, सध्या सगळेच कलाकार आर्थित विवंचनेत आहेत. मालिकांची चित्रिकरणं सुरू झाली आहेत. पण सिनेमाची चित्रकरणं अद्याप सुरूही झालेली नाहीत. बजेटस कमी झालेली आहेत. असं असताना महामंडळाच्या अध्यक्षांनी कलाकार, निर्माते यांची बाजू लावून धरणं अपेक्षित आहे. तसं न करता थेट चित्रकरण बंद करण्याची भाषा करणे हे नकारात्मक वातावरण पसरवण्यासारखं आहे.
आई माझी काळुबाई या मालिकेच्या सेटवर कोरोना पसरला होता. त्यात ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना आपला जीव गमवावा लागला. अर्थात सेटवर कोरोना पसरायची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सिंगिंग स्टार, तुझ्यात जीव रंगला, आंबेडकर आदी अनेक सेटवर कोरोना पसरला होता. त्यावेळी योग्य काळजी घेतली गेल्याने जीवितहानी झाली नाही. आई माझी काळुबाई या सेटवर मात्र दुर्दैवी प्रसंग ओढवला होता.
Rhea Chakraborty Bail | रियाच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला