Shivaji Park Sabha:शिवाजीपार्कसाठी रस्सीखेच,शिवाजी पार्क मैदानावर कुणाचा आवाज घुमणार? Special Report
Shivaji Park Sabha:शिवाजीपार्कसाठी रस्सीखेच,शिवाजी पार्क मैदानावर कुणाचा आवाज घुमणार? Special Report
मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कचं ऐतिहासिक मैदान आणि राजकीय घमासान हे जणू महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचं समीकरण बनलंय. आगामी महापालिका निवडणुकीआधी पुन्हा एकदा शिवाजी पार्कचं मैदान चर्चेत आलंय. प्रचाराची सांगता करण्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी दोन्ही शिवसेना आणि मनसेनं कंबर कसली आहे... पाहूयात
शिवाजी पार्कचं मैदान आणि निवडणुका हे एक वेगळंच समीकरण कारण निवडणुका लागल्या की याच मैदानातून प्रचाराच्या तोफा धडाडतात... उद्धव ठाकरे असोत, एकनाथ शिंदे असोत किंवा मग राज ठाकरे.... दिग्गजांच्या भाषणातून कार्यकर्त्यांना बळ मिळतं.... आणि मग निवडणुकीची रणधुमाळी रंगते.... त्यामुळे शिवाजी पार्कचं मैदान प्रत्येकालाच हवं असतं....
महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर मुंबई महापालिकेत शिवाजी पार्कवर सांगता सभा घेण्यासाठी दोन्ही शिवसेनेकडून आणि मनसेकडूनही अर्ज दाखल झाले आणि परवानगी कुणाला मिळणार याची चर्चा सुरु झाली.... १५ जानेवारीला मुंबईत महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे त्यामुळे त्याआधी शिवाजी पार्कात सांगता सभा घेण्यासाठी दोन्ही शिवसेनेंनी प्रयत्न सुरु केलेयत.... तर ११ जानेवारीसाठी मनसेनेही पत्र दिलंय...
All Shows































