एक्स्प्लोर
दीपिकाची जेएनयूची उपस्थिती होती 'मौल्यवान'?
दीपिका दिल्लीत असताना जेएनयूत तिने उपस्थिती लावली होती. या उपस्थितीसाठी तिला तब्बल पाच कोटी रूपये मिळाल्याचा गौप्यस्फोट रॉचे माजी अधिकारी एनके सूद यांनी केला आहे.
मुंबई : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं ते दीपिका पदुकोणच्या जेएनयूमधल्या उपस्थितीने. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये चालू असलेल्या प्रोटेस्टमध्ये दीपिका सामील झाली होती. त्यावेळी दीपिका छपाक सिनेमाचं प्रमोशन करत होती. या प्रमोशन दरम्यान दीपिका दिल्लीत असताना जेएनयूत तिने उपस्थिती लावली होती. या उपस्थितीसाठी तिला तब्बल पाच कोटी रूपये मिळाल्याचा गौप्यस्फोट रॉचे माजी अधिकारी एनके सूद यांनी केला आहे.
या भेटीमध्ये दीपिका ना कुणाशी बोलली.. ना कुणाशी तिने संवाद साधला. ती तिथे काही काळ थांबली आणि त्यानंतर तिथून ती निघून गेली. सूद यांच्या सागण्यानुसार या भेटीआधी दीपिकाला दोन फोन आले. पैकी एक पाकिस्तानातल्या कराचीमधून आला तर दुसरा कॉल दुबईतून आला. पैकी दुबीईतल्या एका इसमाने तिला जेएनयूतल्या उपस्थितीसाठी पाच कोटी रुपयांची ऑफर दिली. अर्थात तिने ती स्विकारली असा दावा ते करतात.
यावर टीम कंगना रनोटने पुन्हा चर्चेत यायला सुरूवात केली आहे. यासाठी त्यांनी पकडलं आहे स्वरा भास्करला. 'बिचारी स्वरा, जेएनयूमध्ये फुकटात उपस्थिती लावणाऱ्या स्वराला जेएनयूतल्या उपस्थितीसाठी पैसे मिळतात हे माहीतच नव्हतं,' असं तिरकसं ट्विट केलं आहे. यामुळे आता वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. स्वराने यावर अद्याप काहीही भाष्य केलेलं नाही. पण, स्वरा मात्र नेहमी जेएनयूतल्या मुलांच्या समर्थनार्थ पुढे आली आहे.
संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement