एक्स्प्लोर

Vishu Marathi Movie : निसर्गरम्य कोकणात फुलणार गश्मीर आणि मृण्मयीची प्रेमकहाणी; आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Vishu : गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) विशू या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. 1 एप्रिलपासून चित्रपट गृहात होणार रिलीज.

Marathi Movie : मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' (Vishu Marathi Movie) हा चित्रपट प्रेमाची एक अनोखी कहाणी घेऊन 8 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडियावर झळकले होते. समुद्राच्या संथ लाटांवर अलगद हेलकावे घेणारा 'विशू' म्हणजेच गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) यात दिसत होता. तेव्हापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. आता या चित्रपटाचे दुसरं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून यात गश्मीरसोबत मृण्मयी गोडबोले दिसत आहेत. दोन वेगवेगळ्या विश्वात जगणाऱ्या या दोघांच्या आयुष्यात नक्की काय घडामोडी चालू आहेत हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल. 'विशू'च्या निमित्ताने गश्मीर आणि मृण्मयी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. निसर्गरम्य कोकण आणि तिथे हळुवार खुलत जाणारी प्रेमकहाणी आपल्याला 'विशू'मध्ये पाहायला मिळणार आहे. मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित या सिनेमात गश्मीर, मृण्मयीसह ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 

चित्रपटातील नायक 'विशू' निसर्गरम्य अशा कोकणातील समुद्रात, निरभ्र आकाशाखाली, बोटीवर मंद लाटांच्या हेलकाव्यात पहुडलेला दिसत आहे. त्याच्या मनात नक्की कोणते वादळ सुरु आहे, हे जाणून घेण्यासाठी मात्र 1 एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. एक अनोखी प्रेमकथा असणाऱ्या या चित्रपटात गश्मीरसोबत मृण्मयी गोडबोल, ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी अशी तगडी स्टारकास्ट आहे. 

Vishu Marathi Movie : निसर्गरम्य कोकणात फुलणार गश्मीर आणि मृण्मयीची प्रेमकहाणी; आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Vishu Marathi Movie : निसर्गरम्य कोकणात फुलणार गश्मीर आणि मृण्मयीची प्रेमकहाणी; आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणतात, "हा एक कौटुंबिक चित्रपट असून 'विशू'मधून एक गोड प्रेमकहाणी दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. चित्रपटाविषयी मी जास्त काही बोलणार नाही फक्त एकच सांगेन की, काही गोष्टींची जाणीव आणि सकारात्मकता देणारा हा चित्रपट आहे."
 
कृपा प्रॅाडक्शनचा 'विशू' हा दुसरा चित्रपट असून येत्या काळात श्री कृपा प्रॅाडक्शनचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती बाबू कृष्णा भोईर यांची असून मयूर मधुकर शिंदे यांनी 'विशू'चे कथालेखन केले आहे. तर ऋषिकेश कोळी यांनी चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. तर छायाचित्रणाची धुरा मोहित जाधव यांनी सांभाळली आहे. तसेच 'विशू'ला ऋषिकेश कामेरकर यांचे मधुर संगीत दिले असून या संगीताला मंगेश कांगणे यांचा आवाज लाभला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Vishu : ‘विशू’ उलगडणार प्रेमाची अनोखी कहाणी; पोस्टर पाहून प्रेक्षक उत्सुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एका लग्नाची दुसरी गोष्ट! पहिल्या प्रेयसीला मंडपात ताटकळत ठेवलं, दुसऱ्या प्रेयसीसोबत नवरदेव फरार
एका लग्नाची दुसरी गोष्ट! पहिल्या प्रेयसीला मंडपात ताटकळत ठेवलं, दुसऱ्या प्रेयसीसोबत नवरदेव फरार
Madha : माढ्याचा गड राखण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी मैदानात, मोहिते पाटलांच्या होमग्राऊंडवर घेणार विराट सभा
माढ्याचा गड राखण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी मैदानात, मोहिते पाटलांच्या होमग्राऊंडवर घेणार विराट सभा
VIDEO : अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार, राशिद लढला, पण गुजरात हरलं, स्टब्सची शानदार फिल्डिंग
VIDEO : अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार, राशिद लढला, पण गुजरात हरलं, स्टब्सची शानदार फिल्डिंग
DC vs GT, IPL 2024 : थरारक सामन्यात दिल्लीचा विजय, गुजरातचा चार धावांनी पराभव
DC vs GT, IPL 2024 : थरारक सामन्यात दिल्लीचा विजय, गुजरातचा चार धावांनी पराभव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Varsha Gaikwad : धारावीत वर्षा गायकवाड, अनिल देसाईंचा एकत्र प्रचार; ठाकरे-काँग्रेसमधले वाद मिटलेSouth Mumbai Lok Sabha : भाजपसह शिवसेनाही दक्षिण मुंबईसाठी आग्रहीDeepak Sawant : वायव्य मुंबईतून शिवसेनेकडून दीपक सावंत लढण्यास इच्छूकAaditya Thackeray Vs Devendra Fadnavis : सत्तेसाठी विचार सोडणाऱ्यांनी बोलू नये : फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एका लग्नाची दुसरी गोष्ट! पहिल्या प्रेयसीला मंडपात ताटकळत ठेवलं, दुसऱ्या प्रेयसीसोबत नवरदेव फरार
एका लग्नाची दुसरी गोष्ट! पहिल्या प्रेयसीला मंडपात ताटकळत ठेवलं, दुसऱ्या प्रेयसीसोबत नवरदेव फरार
Madha : माढ्याचा गड राखण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी मैदानात, मोहिते पाटलांच्या होमग्राऊंडवर घेणार विराट सभा
माढ्याचा गड राखण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी मैदानात, मोहिते पाटलांच्या होमग्राऊंडवर घेणार विराट सभा
VIDEO : अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार, राशिद लढला, पण गुजरात हरलं, स्टब्सची शानदार फिल्डिंग
VIDEO : अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार, राशिद लढला, पण गुजरात हरलं, स्टब्सची शानदार फिल्डिंग
DC vs GT, IPL 2024 : थरारक सामन्यात दिल्लीचा विजय, गुजरातचा चार धावांनी पराभव
DC vs GT, IPL 2024 : थरारक सामन्यात दिल्लीचा विजय, गुजरातचा चार धावांनी पराभव
Pushkar Shrotri : पुष्कर श्रोत्रीचं 55 व्या वाढदिवशी 55 वं नाटक रंगभूमीवर; साकारणार 10 फुटी व्यक्तिरेखा
पुष्कर श्रोत्रीचं 55 व्या वाढदिवशी 55 वं नाटक रंगभूमीवर; साकारणार 10 फुटी व्यक्तिरेखा
ऋषभ पंतकडून विराट कोहलीला टक्कर, विश्वचषकासाठी दावाही ठोकला
ऋषभ पंतकडून विराट कोहलीला टक्कर, विश्वचषकासाठी दावाही ठोकला
मोहित शर्माच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज
मोहित शर्माच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज
OTT Movies : ओटीटीवर हॉरर धमाका! स्वत:च्या सावलीलाही घाबराल, अशा सत्य घटनांवर आधारित चित्रपटांची मेजवानी
ओटीटीवर हॉरर धमाका! स्वत:च्या सावलीलाही घाबराल, अशा सत्य घटनांवर आधारित चित्रपटांची मेजवानी
Embed widget