एक्स्प्लोर

व्हायरल गर्लनं फरमान खानशी केलं लग्न, हत्येच्या धमकीमुळे दोघेही घाबरले; मोनालिसाने सगळंच सांगितलं

Monalisa Bhosle and Husband Claim Life Threats: मोनालिसा आणि तिचा पती फरमान खानला जीवे मारण्याची धमकी.

Monalisa Bhosle viral girl death threats video: महाकुंभ मेळ्यात बरेच जण सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यातील एक आपल्या डोळ्यांनी मोहित करणारी व्हायरल गर्ल मोनालिसाचीही प्रचंड चर्चा झाली. सध्या मोनालिसा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मोनालिसाने नुकतंच फरमान खान नावाच्या तरुणाशी विवाह केला होता.  दोघांनी केरळमधील एका मंदिरात साताजन्माची गाठ बांधली.  मोनालिसाने अलिकडेच एक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे. या व्हिडिओत ती फरमानसोबत मदतीची मागणी करत आहे.  तिला आणि तिच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचं मोनालिसाने सांगितलं. 

खरंतर मोनालिसाने फेसबुक पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.  या व्हिडिओत कपलने  सार्वजनिकरित्या मदतीचे आवाहन केले आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी या प्रकरणात सीएमस, पोलीस आयुक्त आणि प्रसारमाध्यमांनाही लक्ष घालण्याची विनंती केली आहे.  यावेळी जोडप्याने आपल्या धमकी मिळत असल्याचं सांगितले आहे. 

जोडप्याने केलेल्या आरोपानुसार, त्यांना जीवे मारण्याची आणि शरीराचे तुकडे करण्याचीही धमकी मिळाली आहे. धमकी मिळाल्यानंतर  त्यांना धक्का बसला.  मोनालिसाने सांगितले की, त्यांनी आपल्या  सुरक्षेची मागणी करत अधिकाऱ्यांना औपचारिकपणे पत्र आणि ईमेल पाठवले आहे. व्हिडिओमध्ये मोनालिसा म्हणाली, 'मी मोनालिसा भोसले, हे माझे पती फरमान खान.  मी मेल, लेटर आणि व्हिडिओ देखील शेअर करत आहे. प्लीज आमची मदत करा.  आम्हाला उघडपणे जीवे मारण्याची धमकी, तसेच हत्येची धमकी मिळाली आहे', अशी माहिती तिनं आपल्या व्हिडिओतून दिली. 

मोनालिसा आणि फरमान आपल्या लग्नामुळेही चर्चेत होते. त्यांनी आपल्या लग्नाला केरळ सरकारकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले आहे. 11 मार्च 2026 रोजी अरुमानूर येथील श्री नैनार देव मंदिरात झालेल्या या लग्नाला अपेक्षापेक्षा खूप  जास्त गर्दी जमली होती. फरमानने आपला आनंद व्यक्त करत म्हटले की,  आपले लग्न इतके भव्य होईल, असं वाटलं नव्हतं. शिक्षणमंत्र्यांसह अनेक मान्यवर  या कार्यक्रमाला उपस्थित होते.  तसेच त्यांनी आशीर्वादही दिले. मोनालिसानेही केरळ प्रशासनाचे कौतुक केले. 'सर्व धर्म समान आहेत, सर्व धर्मांवर विश्वास आहे', असं मोनालिसा म्हणाली. दरम्यान, त्यांना नेमकं कोण जीवे मारण्याची धमकी देत आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

गोव्याचा प्लॅन फसणार नाही रंगणार; स्ट्रगलर सालानंतर 'मामाच्या गोव्याचा जाऊया' प्रेक्षकांच्या भेटीला, विजू माने म्हणाले..

प्रसिद्ध अभिनेता, Action Heroचं निधन, कुटुंबाकडून भावनिक पोस्ट शेअर; सिनेसृष्टीत शोककळा

महत्त्वाच्या बातम्या

Shreya Kalra Lock Upp Season 2 Winner: श्रेया कालरा जिंकली 'लॉक अप 2'ची ट्रॉफी; शिवांगी जोशीला 7 मतांनी हरवत जिंकली 1 कोटींचं बक्षीस
श्रेया कालरा जिंकली 'लॉक अप 2'ची ट्रॉफी; शिवांगी जोशीला 7 मतांनी हरवत जिंकली 1 कोटींचं बक्षीस
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
Embed widget