एक्स्प्लोर

प्रसिद्ध अभिनेता, Action Heroचं निधन, कुटुंबाकडून भावनिक पोस्ट शेअर; सिनेसृष्टीत शोककळा

Hollywood Legend Chuck Norris Death News: अभिनेता चक नॉरिस यांचं निधन झालं आहे. मनोरंजनसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.

Martial Arts Icon Chuck Norris Dies: हॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे.  दिग्गज अभिनेते चक नॉरिस यांचं निधन झाले आहे.  86 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला.  चकने आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 'लोन वुल्फ मॅकक्वेड', 'कोड ऑफ साइलेंस' आणि 'वेह ऑफ द ड्रॅगन', या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचं प्रचंड कौतुक झालंय.  कलाकाराच्या निधनानंतर अभिनेत्याच्या कुटुंबाने एक पोस्ट सोशल मीडियात शेअर केलीये.  या पोस्टमधून त्यांनी अभिनेत्याच्या निधनाची अधिकृत माहिती दिली. सध्या ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  त्यांच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनी पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. 

चक नॉरिसच्या कुटुंबाने इन्स्टाग्रामवर एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.  त्यांनी पोस्टमध्ये चक यांचा फोटो शेअर केला आहे. तसेच फोटोला एक  भावनिक कॅप्शन दिला आहे. 'अत्यंत दु:खाने, आमच्या लाडक्या चक नॉरिस यांच्या  आकस्मिक निधनाची बातमी देत आहोत.  आम्ही  ही बातमी खासगी ठेवणार होतो.  शेवटच्या क्षणी ते कुटुंबासोबत होते.  शांतीने आमच्या आयुष्यातून निघून गेले', असं कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

'जगासाठी ते एक महान  मार्शल आर्टिस्ट आणि अभिनेता होते.  पण आमच्यासाठी ते एक चांगले पती, मुला बाळांवर प्रेम करणारे वडील,  भाऊ आणि आमच्या कुटुंबाचे ह्रदय होते. त्यांनी आपले  पूर्ण आयुष्य श्रद्धा, ध्येय आणि आपल्या प्रियजनांप्रती पूर्ण निष्ठेने जगले', असंही पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे. 

नॉरिसच्या कुटुंबाने आपल्या चाहत्यांसाठीही एक मेसेज शेअर केला आहे. 

'चक नॉरिस यांनी आपल्या कारकि‍र्दीत, कामातून, शिस्तीतून आणि दयाळूपणातून जगातील लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे.  त्यांच्या निधनानंतर आम्ही तुटलो आहोत.  पण त्यांनी आमच्यासोबत घालवलेल्या क्षणांबाबत आभारी आहोत. जगभरातील त्याच्या चाहत्यांकडून मिळालेले प्रेम  आणि पाठिंबा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे होते.  कुटुंबाच्या वतीने आम्ही चाहत्यांचे मनापासून आभारी मानतो. कृपया या दु:खद काळात आमच्या कुटुंबाला एकांत द्या. तुमच्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद', असं म्हणत त्यांच्या कुटुंबाने फॅन्सकडून मिळणाऱ्या पाठिंबा आणि प्रेमासाठी आभार व्यक्त केल्या आहेत.

चक यांची प्रकृती नाजूक होती

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chuck Norris (@chucknorris)

टीएमजेडच्या वृत्तानुनासर,  या महिन्यात चक यांनी 86व्या वर्षी पदार्पण केलं होतं. 19 मार्च रोजी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget