Vikrant Massey : 'अश्लील सिन्स आणि...'; ओटीटी कंटेंटबाबत विक्रांत मेस्सीनं सोडलं मौन
ओटीटीवरील कंटेंटमध्ये बदल झाला, असं विक्रांत (Vikrant Massey) या मुलाखतीमध्ये म्हणाला.
Vikrant Massey : हिंदी चित्रपसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. मिर्जापुर (Mirzapur) या सीरिजमधील विक्रांतच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. नुकत्याच एका मुलाखतीबाबत विक्रांतनं ओटीटीवरील कंटेटबाबत सांगितलं. ओटीटीवरील कंटेंटमध्ये बदल झाला, असं विक्रांत या मुलाखतीमध्ये म्हणाला.
ओटीटी कंटेंटबाबत विक्रांतनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'जेव्हा मी अभिनय करण्यास सुरुवात केली होती तेव्हापासून आत्तापर्यंत ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटमध्ये बराच बदल झाला आहे. एक वेळ अशी होती जेव्हा काही मोजकेच ओटीटी प्लॅटफॉर्म होते. पण आता ओटीटी प्लॅटफॉर्मच्या संख्येत वाढ झाली आहे. काही वर्षांपूर्वी ओटीटीवर अश्लील सिन्स आणि शिव्या असणारा कंटेंट होता. पण आता यामध्ये बदल झाला आहे. ही चांगली गोष्ट आहे. '
विक्रांतनं छोट्या पडद्यावरुन करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ओटीटी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यास त्यानं सुरुवात केली. अभिनेत्री दीपिका पादूकोणसोबत त्यानं छपाक या चित्रपटामध्ये काम केलं. नुकतीच त्याचा फॉरेंसिक हा चित्रपट झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. ब्रोकन बट ब्लूटीफुल या ओटीटीवरील सीरिजमध्ये देखील विक्रांतनं काम केलं. तसेच अभिनेत्री तापसी पन्नूसोबत त्यानं हसिन दिलरुबा या चित्रपटात काम केलं.
शीतल ठाकूरसोबत विक्रांतनं बांधली लग्नगाठ
विक्रांतचा 14 फेब्रुवारी रोजी विवाह सोहळा पार पडला. त्यानं शीतल ठाकूरसोबत लग्नगाठ बांधली. 2015 पासून विक्रांत आणि शीतल एकमेकांना डेट करत होते. गेल्या वर्षी दोघांचा साखरपुडा झाला होता. कृती खरबंदा, तापसी पन्नू, मौनी रॉय, सोनाक्षी सिन्हा, बॉबी देओल, आहना कुमरा, ईशा गुप्ता आणि अनूप सोनी या कलाकारांनी सोशल मीडियावरून विक्रांत आणि शीतलला शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा: