हिंदी सक्तीवरुन वाद सुरु असतानाच विद्या बालनने टायमिंग साधलं, इरकल साडी नेसून मराठी भाषेत रील शेअर VIDEO
Vidya Balan shares reel in Marathi language : इरकल साडी नेसली, भाऊ कदमच्या कॉमेडी डायलॉगवर रील; विद्या बालनने शेअर केला खास व्हिडीओ

Vidya Balan shares reel in Marathi language : राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी राज्यातील 1 ली ते 4 थीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यभरातील लोकांनी संताप व्यक्त केल्यानंतर ही सक्ती मागे घेण्यात आली. मात्र, राज्य सरकारने मराठी आणि इंग्रजी शिवाय आणखी एक भाषा मुलांनी शिकावी, यासाठी आग्रह सुरु केलाय. त्यामुळे काहीतरी करुन राज्यातील मुलांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीका विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारवर केली आहे. राज्यभरात हिंदी सक्तीवरुन वाद सुरु असताना अभिनेत्री विद्या बालन हिने टायमिंग साधलंय. विद्या बालन हिने अभिनेते भाऊ कदम यांच्या कॉमेडी डायलॉगवर एक रील बनवलंय. (Vidya Balan shares reel in Marathi language) विद्या बालनने हे रील इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं आहे. (Vidya Balan shares reel in Marathi language)
View this post on Instagram
अभिनेत्री विद्या बालन हिने इरकलची साडी नेसून भाऊ कदम यांच्या डायलॉगवर अभिनय केला आहे. मराठी भाषेतील रील करण्यासाठी विद्या बाललने खास मराठमोठा लूक केलाय. विशेष म्हणजे विद्या बालनचा हा लूक ग्रामीण भागातील महिलांप्रमाणे असल्याचं बोललं जातंय. "ही वेळ मराठी भाषेत रील शूट करण्याची आहे. कारण मी एका मराठी सिनेमासाठी शूटींग करत आहे", असं कॅप्शन विद्या बालन हिने रील शेअर करताना दिलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन रितेश देशमुखच्या आगामी 'राजा शिवाजी' या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे निश्चित केले आहे. विद्या बालनने स्वत: याबाबतची माहिती दिली आहे. चित्रपटात आधीच संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि जेनेलिया देशमुख यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. रितेशच्या राजा शिवाजी या सिनेमाचे शूटींग सध्या जोरात सुरू आहे. हा चित्रपट 1 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
रितेश देशमुख याने ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबरोबरच दिग्दर्शनाची जबाबदारीही घेतली आहे. त्याने जिओ स्टुडिओजसोबत भागीदारी करून हा प्रोजेक्ट हाती घेतला होता. 'राजा शिवाजी' हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून प्रेक्षक हा चित्रपट पाहाण्यासाठी आतूर आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आधीच कट्यार, त्यात जीवघेणी धार! अभिनेत्री पूजा सावंतचं भर पावसात फोटोशूट























