Kuberaa Screening Accident: बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवणाऱ्या सिनेमाचा शो सुरू होता, त्याचवेळी थिएटरचं अख्खं सिलिंग कोसळलं, कित्येक प्रेक्षक जखमी Viral Video
Kuberaa Screening Viral Video: तेलंगणातील मेहबूबाबाद येथील मुकुंदा थिएटरमध्ये धनुष, रश्मिका मंदाना स्टारर 'कुबेरा' सिनेमाचं स्क्रिनिंग सुरू होतं.

Kuberaa Screening Viral Video: धनुष (Dhanush), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि नागार्जुन (Nagarjuna) स्टारर 'कुबेरा' (Kuberaa) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप धमाल करत आहे. पण, आता सिनेमाचा शो सुरू असतानाच थिएटरमध्ये घडलेली एक भयावह बाब समोर आली आहे. तेलंगणातील एका थिएटरमध्ये 'कुबेरा' सिनेमाचा शो सुरू होता, तेवढ्यात थिएटरचं सिलिंग अचानक कोसळलं. दुर्घटनेत सिनेमा पाहण्यासाठी आलेले अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, या घटनेचा एक व्हिडीओ (Kuberaa Screening Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून पुरते हादरुन जाल.
स्क्रिनिंग सुरू होतं, तेवढ्यात सिलिंग कोसळलं
तेलंगणातील मेहबूबाबाद येथील मुकुंदा थिएटरमध्ये धनुष, रश्मिका मंदाना स्टारर 'कुबेरा' सिनेमाचं स्क्रिनिंग सुरू होतं. रात्री उशीराचा शो होता, फिल्मचं स्क्रिनिंग सुरू झालं आणि काही वेळातच थिएटरचं सिलिंग खाली कोसळलं. सिलिंग कोसळल्यानंतर एकच गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, लोक आरडा-ओरडा करत थिएटरमधून बाहेर पळाले. तर, काही सिलिंगच्या मलब्याखाली गाडले गेले. अपघाताची माहिती मिळताच तातडीनं पोलीस आणि इतर प्रशासकीय सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आणि तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं. सर्व जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
BREAKING 🚨
— Movies4u (@Movies4uOfficl) June 26, 2025
During the second show of #Kuberaa at Mukunda Theatre in Mahabubabad, the ceiling suddenly broke and fell on the audience. A few people got slightly injured. pic.twitter.com/j2byPiuPNP
थिएटर मालकांविरोधात कारवाईची मागणी
या अपघाताचा व्हिडीओ समोर येताच लोकांनी थिएटर व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली. अनेकजण म्हणतायत की, जेव्हा ते कुटुंबासह मनोरंजनासाठी थिएटरमध्ये येतात, तेव्हा त्यांना अशा प्राणघातक निष्काळजीपणाची अपेक्षा नसते. तसेच, काही लोक सिनेमा हॉलच्या मालक आणि व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी करत आहेत. दरम्यान, या घटनेबाबत थिएटर व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.
प्रेक्षकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
सिनेमागृहातील या दुःखद घटनेबाबत प्रेक्षकांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. थिएटरच्या व्यवस्थेबद्दल आणि देखभालीबद्दल लोक सोशल मीडियावर सतत चिंता व्यक्त करत आहेत. दरम्यान, या अपघाताचा धनुष, नागार्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या 'कुबेरा' (Kuberaa Box Office Collection) चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होतो की नाही? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. चित्रपटानं आतापर्यंत भारतात सुमारे 65 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























