एक्स्प्लोर

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन झालं आहे. त्या 79 वर्षांच्या होत्या. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर गेले चार दिवस उपचार सुरू होते.

सातारा : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले असून साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर गेले चार दिवस उपचार सुरू होते. आई माझी काळूबाई या सिरियलचे शुटिंग सुरू असताना त्यांना लागण झाली होती. आशालता वाबगावकर यांच्याव्यतिरिक्त सेटवरील इतर 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

गेले चार दिवस आशालता वाबगावकर यांच्यावर साताऱ्यात उपचार सुरू होते. मालिकेच्या सेटवर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. जवळपास 40 हून अधिक वर्षांसाठी त्या रंगभूमी, सिनेमा आणि मालिकांमधून काम करत होत्या. तसेच नाट्यसंगीतामधूनही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

आशालता या मूळच्या गोव्याच्या असून, त्यांनी कोकणी आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी आत्तापर्यंत मराठी आणि हिंदी अशा सुमारे 100 हून अधिक चित्रपटांमधून काम केले आहे. 'गुंतता हृदय हे, रायगडाला जेव्हा जाग येते, चिन्ना आणि महानंदा’ यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली. तर बासू चटर्जी यांच्या 'अपने पराये'या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे नामांकनही मिळालं होतं. मराठी चित्रपट सृष्टीत 'उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया, माहेरची साडी' हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.

गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या 'माझी आई काळुबाई' या मालिकेच्या सेटवर कोरोनाने धाड टाकल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. साताऱ्यात या मालिकेचं चित्रिकरण सुरू असताना या सेटवरच्या तब्बल 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय, या मालिकेतील महत्वाच्या भूमिकेत असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनाही लागण झाली होती. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे साताऱ्यातील रूग्णालयातच त्यांच्यावर उपचार सुरू होते.

'आई माझी काळूबाई' ही मालिका लॉकडाऊननंतरच्या काळात सुरू झाली. या मालिकेत प्राजक्ता गायकवाड, अलका कुबल, आशालता वाबगावकर यांच्या मुख्य भूमिका आहे. या मालिकेचा तामझाम मोठा आहे. या मालिकेत गाण्याचं चित्रिकरण चालू होतं. त्यासाठी काही मंडळी मुंबईतून आली होती. साताऱ्याजवळ असलेल्या खानविलकर फार्महाऊसवर या गाण्याचं चित्रिकरण सुरू होतं. तिथेच कोरोनाचा संसर्ग झाला. त्यातून 27 जण कोरोना बाधित झाले.

महत्त्वाच्या बातम्या

Gaurav More: गौरव मोरेनं घेतला iPhone 18 Pro; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सची घेतली फिरकी!
गौरव मोरेनं घेतला iPhone 18 Pro; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सची घेतली फिरकी!
Sachin Pilgaonkars Guru: सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Aamir Khan Raj Thackeray Imran Khan: भाच्याला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
भाच्याला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
Tukaram Mundhe on GenZ : जेनझीबाबत समाजात गैरसमज आहेत, माझी जेनझीबाबत मतं वेगळी आहेत.. तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
जेनझीला दांभिकपणा बिल्कूल आवडत नाही, तुकाराम मुंढे जेनझींची आवडणारी गोष्ट सांगत म्हणाले...
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Washim Crime News: किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
Embed widget