Varun Dhawan : 'वडील मारहाण, शिवीगाळ करतात' ट्वीट करुन युझरनं मागितली मदत; वरुण म्हणाला...
एका मुलीनं ट्वीट शेअर करुन वरुण धवनकडे (Varun Dhawan) मदत मागितली आहे.
![Varun Dhawan : 'वडील मारहाण, शिवीगाळ करतात' ट्वीट करुन युझरनं मागितली मदत; वरुण म्हणाला... varun dhawan responds to girl alleging she and her mother are facing domestic abuse Varun Dhawan : 'वडील मारहाण, शिवीगाळ करतात' ट्वीट करुन युझरनं मागितली मदत; वरुण म्हणाला...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/27114553/Varun-Dhawan-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Varun Dhawan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्ला वरुण अनेक वेळा रिप्लाय देतो. एका मुलीनं ट्वीट शेअर करुन वरुण धवनकडे मदत मागितली आहे. तिचे वडील हे तिचा आणि तिच्या आईचा छळ करतात, अशी माहिती या ट्वीटमध्ये त्या मुलीनं दिली आहे.
वैदेही नावाच्या या ट्विटर अकाऊंटवरुन हे ट्वीट शेअर करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये त्या मुलीनं लिहिलं, 'आदरणीय सर, माझे वडील हे माझा आणि माझ्या आईचा छळ करतात. त्यांनी अनेकदा मारहाण आणि शिवीगाळ केली आहे. ते मला आणि माझ्या आईला रोज शिवीगाळ करतात. ते अनेक दिवस मला जेवायला देत नाहीत, ते मला शिवीगाळ करुन धमकावत असतात.' या ट्वीटला वरुणनं रिप्लाय दिला आहे. त्यानं रिप्लाय देत लिहिलं, 'ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि जर हे खरे असेल तर मी तुम्हाला मदत करेन आणि अधिकाऱ्यांशी बोलेन.'
This an extremely serious matter and if this is true I will help will u and speak to the authorities. https://t.co/IaIOEMFk8u
— VarunKukooDhawan (@Varun_dvn) June 6, 2022
वरुण धवन यांचा जुग जुग जियो हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये वरुणसोबतच कियारा अडवाणी, अनिल कपूर, नीतू कपूर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 24 जून 2022 रोजी रिलीज होणार आहे. राज मेहता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच प्राजक्ता कोळी आणि मनीष पॉल यांनी या चित्रपटामध्ये काम केलं आहे. सिनेमात असणाऱ्या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)