Urfi Javed : साखळी अन् कुलुपांचा टॉप घालणं उर्फीला पडलं महागात; मानेचा फोटो पाहून नेटकरी थक्क
Urfi Javed : साखळी आणि कुलुपांचा टॉप आणि ब्लॅक नेटचा स्कर्ट असा लूक उर्फीनं केला होता.
Urfi Javed : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत असते. अनेक वेळा उर्फीला तिच्या बोल्ड कपड्यांमुळे ट्रोल केले जाते. ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. काही दिवसांपूर्वी उर्फीनं एक हटके लूक केला होता. साखळी आणि कुलुपांचा टॉप आणि ब्लॅक नेटचा स्कर्ट असा लूक उर्फीनं केला होता. या लूकमधील उर्फीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण असा लूक करणं उर्फीला महागात पडलं. उर्फीनं तिच्या मानेला झालेल्या जखमेचा फोटो शेअर केला आहे.
उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये तिच्या मानेला झालेली दुखापत दिसत आहे. उर्फी ही 25 वर्षाची आहे. बिग बॉस ओटीटीमुळे उर्फीला विशेष लोकप्रियता मिळाली.
View this post on Instagram
उर्फीने भैया की दुल्हनिया, मेरी दुर्गा, बेपनाह आणि पंच बीट सीजन 2 या मालिकेमध्ये काम केले. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिला इंस्टाग्रामवर 1.6 मिलियनपेक्षा जास्त फोलवर्स आहेत.
हेही वाचा :
- Majha Katta : 'मी जात मानत नाही', सोशल मीडियावरच्या टीकेला नागराजचं उत्तर
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Virajas Kulkarni : व्हिक्टोरिया! थंडी, पाऊस आणि रक्ताच्या धारांमधून… 'व्हिक्टोरिया'साठी विराजसची खास पोस्ट!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha