Movies and Web Series : डिसेंबरमध्ये मनोरंजनाचा डबल डोस; 'या' वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
डिसेंबर महिन्यामध्ये अनेक वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
Upcoming Movies and Web Series in December 2021: डिसेंबर महिन्यामध्ये अनेक वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. हे चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही घरबसल्या ओटीटी प्लॅटफोर्मवर पाहू शकता.
बॉब बिस्वास (Bob Biswas)
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा बॉब बिस्वास हा चित्रपट 3 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री चित्रगंदा सिंह देखील महत्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट झी-5 अॅपवर प्रदर्शित होणार आहे.
आर्या 2 (Aarya 2)
प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनच्या आर्या या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. आता या वेब सीरिजचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आर्या-2 ही वेब सीरिज 10 डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. सीरिजचे दिग्दर्शन हे राम माधवानी यांनी केले आहे.
अरण्यक (Aranyak)
अरण्यक ही सीरिज 10 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहेय. या सीरिजमध्ये रवीना टंडनने प्रमुख भूमिका साकारली आहे. ही वेब सीरिज 10 डिसेंबर रोजी नेटफ्लिकवर प्रदर्शित होणार आहे. सीरिजमध्ये आशुतोष राणा, जाकिर हुसैन, मेघना मलिक हे कलाकार महत्वाची भूमिका साकारणार आहेत.
अतरंगी रे (Atrangi Re)
अक्षय कुमार,धनुष आणि सारा अली खानच्या यांचा आगामी 'अतरंगी रे' हा चित्रपट 24 डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. 'अतरंगी रे' चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल रायने केले आहे. तर हिंमाशु शर्मा यांनी या सिनेमाचे लेखन केले आहे.