TV Actor Abhay Daga Ranked 185 In UPCS: छंद म्हणून अॅक्टिंग केली, मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी मिळाली, पण 'ते' घडलं अन् अभिनेत्यानं UPSC दिली; फर्स्ट अटेंपमध्ये बनला IAS
TV Actor Abhay Daga Ranked 185 In UPCS: यूपीएससी ही अशी परीक्षा आहे की, लोक वर्षानुवर्ष त्यासाठी कठोर परिश्रम करतात, पण फार कमी लोकांना यश मिळतं.

TV Actor Abhay Daga Ranked 185 In UPCS: सिनेइंडस्ट्रीत नाव कमावण्याचं स्वप्न घेऊन अनेकजण येतात. अनेक अशी उदाहरणं आहेत की, ज्यांनी इंडस्ट्रीत नाव कमावण्यासाठी आपल्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून दिल्या. इंडस्ट्रीतील काही कलाकारांनी सरकारी नोकऱ्या सोडल्या, तर काहींनी डॉक्टर आणि इंजिनिअर असूनही नोकऱ्या सोडून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. पण, आज आम्ही ज्या अभिनेत्याबाबत सांगणार आहोत, त्याची कहाणी जराशी उलटी आहे. पण, आगळी वेगळी आहे. या अभिनेत्यानं आपला छंद पूर्ण करण्यासाठी अभिनय केला, पण ज्यावेळी करिअरचा प्रश्न आला, तेव्हा त्यानं मेहनत घेतली, कठोर परिश्रम केले आणि आयएएस अधिकारी बनला. आम्ही ज्या अभिनेत्याबाबत बोलत आहोत, तो अभिनेता म्हणजे, टेलिव्हिजन मालिका 'सिया-राम' चा अभिनेता अभय डागा.
अभिनय करता करता कला IIT चा अभ्यास
अभयनं अभिनयाच्या जगात प्रवेश केला, तेव्हा तो आयआयटीमध्ये शिकत होता. आयआयटीमधून अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर, अभयनं यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर, अभिनेत्याला अखेर यश मिळालं, त्यानं 185 वा क्रमांक मिळवला. दरम्यान, अभयसाठी इथे पोहोचणं सोपं नव्हतं. कठोर परिश्रम, समर्पण आणि आवडीनं त्यानं शेवटी जे स्वप्न पाहिलं ते सर्व साध्य केले.
शालेय शिक्षण हैदराबादमध्ये झालं
महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात जन्मलेल्या अभय डागाचे आईवडील दोघेही डॉक्टर आहेत. अभयनं हैदराबादमध्ये अकरावी आणि बारावीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यानं आयआयटीमध्ये जाण्यासाठी खरगपूरमध्ये प्रवेश घेतला. अभय नेहमीच अभ्यासात खूप हुशार होता, पण कम्प्युटर सायन्सचा अभ्यास करत असताना त्याची अभिनयात आवड वाढली.
अभयला अभिनयात रस कसा निर्माण झाला?
खरं तर, आयआयटी महाविद्यालयांमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या काळात अभय थिएटर आणि नाटकांमध्ये भाग घेऊ लागला. त्यानं अनेक नाटकांमध्ये काम केलंय. इथेच त्याला हे देखील जाणवलं की, त्याला अभिनय खूप आवडतो आणि तो त्यात करिअर देखील करू शकतो. अशा परिस्थितीत, अभयनं अनेक ठिकाणी ऑडिशन्स देण्यास सुरुवात केली आणि शेवटी त्याला त्याचा पहिला शो मिळाला. तो स्टार प्लसच्या हिट मालिका 'सिया के राम'मध्ये दिसला.
IAS होण्यासाठी सोडली नोकरी
अर्थात, अभयनं अभिनय एक छंद म्हणून स्वीकारला होता, परंतु असं असूनही, अभयनं कधीही त्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं नाही. दरम्यान, 2018 मध्ये अभयनं मायक्रोसॉफ्टमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तो सायबर सुरक्षा टीमचा भाग बनला. त्यानं सायबर सुरक्षा जागरूकता वाढविण्यातही उत्तम काम केलं. या दिवसांत देशभरात यूपीआयचा ट्रेंड वाढू लागला. त्याच वेळी, यामुळे लोक ऑनलाईन फसवणुकीला बळी पडू लागले. अशा परिस्थितीत, 2021 मध्ये अभयनं नोकरी सोडून यूपीएससीचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत, अभयच्या या निर्णयानं त्याचं कुटुंबही खूप आश्चर्यचकित झालं.
पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण
अभयनं अखेर नोकरी सोडली आणि यूपीएससीची तयारी सुरू केली. यासाठी, त्यानं दोन वर्ष कठोर परिश्रम केले, ज्याचा परिणाम असा झाला की, अभयनं भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक, यूपीएससी, पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आणि 185 वा क्रमांक मिळवला. त्यानंतर, आयएएस अधिकारी होण्याचं त्याचं स्वप्नही पूर्ण झालं. अभयचा हा प्रवास प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे. एखाद्या व्यक्तीला जर खरोखर काहीतरी करण्याची इच्छा असेल, तर आपण ते साध्य करू शकतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























