Mahesh Bhatt On Parveen Babi: 'तिच्या अंगावर कपडे नव्हते, पावसात माझ्या मागे धावत होती...'; महेश भट्ट यांनी सांगितला परवीन बाबींचा 'तो' किस्सा
Mahesh Bhatt On Parveen Babi: महेश भट्ट यांच्या अनेक अफेअर्सच्या चर्चा रंगलेल्या. पण, त्यातल्या त्यात बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री परवीन बाबी आणि महेश भट्ट यांचं अफेअर विशेष गाजलं.

Mahesh Bhatt On Parveen Babi: बॉलिवूड इंडस्ट्रीतील (Bollywood Industry) दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव, महेश भट्ट (Mahesh Bhatt). आताच्या पिढीला त्यांची ओळख करुन द्यायची झाली तर, कदाचित बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींमध्ये समाविष्ट होणारी अभिनेत्री आलिया भट्टचे (Alia Bhatt) वडील, अशी करुन द्यावी लागेल. पण, 80 आणि 90 च्या दशतकात महेश भट्ट हे नाव आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये समाविष्ट व्हायचं. महेश भट्ट यांच्या चित्रपटांच्या चर्चा जेवढ्या रंगतात, तेवढ्याच चर्चा महेश भट्ट यांच्या अफेअर्सच्या रंगतात. अनेक महिलांसोबत महेश भट्ट यांचं नाव जोडलं जातं. आलिया भट्टची आई अभिनेत्री सोनी राजदान (Soni Razdan) हिच्यासोबत महेश भट्ट यांनी दुसरं लग्न केलं, आजही दोघे एकत्र आहेत. पण, त्यापूर्वी आणि त्यानंतही महेश भट्ट यांचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेश भट्ट यांच्या अनेक अफेअर्सच्या चर्चा रंगलेल्या. पण, त्यातल्या त्यात बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री परवीन बाबी आणि महेश भट्ट यांचं अफेअर विशेष गाजलं. परवीन बाबी यांचा मृत्यू फारच क्लेशदायी परिस्थितीत झालेला. त्यावेळी फक्त आणि फक्त महेश भट्ट हेच त्यांच्याजवळ गेले होते. महेश भट्ट यांनी स्वतः अनेक मुलाखतींमध्ये बोलताना परवीन बाबी आणि त्यांच्यातील नात्याबाबत उलगडा केला आहे. तसेच, अनेक खळबळजनक गोष्टींचा खुलासाही त्यांनी केला आहे.
महेश भट्ट यांनी एकदा बोलताना सांगितलेलं की, परवीन बाबींनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली होती. याबाबत सांगताना त्यांनी त्यावेळी काय-काय घडलेलं, यासंदर्भात संपूर्ण किस्सा सविस्तर सांगितला.
महेश भट्ट यांनी सांगितलं की, "मला आठवतंय की, ही तीच बेडरूम होती, जिथे मी आणि परवीन एकमेकांच्या जवळ आलेलो. त्यावेळी परवीन मला म्हणालेली की, महेश एकतर मी किंवा यू. जी.?"
महेश भट्ट म्हणाले की, "मी सुन्न झाली आणि तिच्याकडे एकटक पाहत होतो. ती सुद्धा माझ्या डोळ्यांत पाहत होती. मी काहीच उत्तर दिलं नाही, पण तिला समजलं. ती रडायला लागली, त्यानंतर मी कपडे घातले. ती म्हणाली, एसी बंद कर, मला खूप थंडी लागतेय. संपूर्ण खोलीत शांतता पसरली, बाहेर पाऊस पडत होता. मी गुपचूप खोलीतून बाहेर पडलो, तिनं मला आवाज दिला. पण मी मागे वळून पाहिलं नाही. मी लिफ्टची वाटसुद्धा पहिली नाही आणि जिन्यावरून खाली उतरलो. मला जिन्यावरून ती खाली उतरत असल्याचा आवाज आला."
"मला एकक्षण वाटलं की, मी मागे जावं आणि तिला सांगावं की, तू अशी विवस्त्र घराबाहेर पडू शकत नाही. पण, मी कसलीही पर्वा न करता कोसळणाऱ्या पावसात तसा पुढे जात राहिलो. ती तशीच विवस्त्र माझ्यामागे भर पावसात धावत येत होती. मी लगेच तिला घरात परत आणलं.", असं महेश भट्ट यांनी सांगितलं. त्यानंतर मात्र परवीन बाबी आणि महेश भट्ट यांच्या नात्यात दुरावा आला. दोघे एकमेकांना कधीच भेटले नाहीत. महेश भट्ट यांनी परवीन बाबींसोबतचं नातं संपवलं आणि आपली पहिली पत्नी लॉरेनकडे परतले. दोघांना एक गोंडस मुलगी झाली, ती म्हणजे, बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























