Tunisha Sharma: तुनिषाच्या आत्महत्येचं खरं कारण समोर; पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय?
हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिशा शर्मानं (Tunisha Sharma) काल आत्महत्या केली. या प्रकरणी शीझान खानला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Tunisha Sharma Latest News: हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिशा शर्मानं (Tunisha Sharma) काल आत्महत्या केली. वसईनजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात तुनिषाच्या मृत्यूचं कारण गळफास हेच असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. तिच्या आईचं म्हणन होतं की, शीझानचं आणि तुनिषाचा ब्रेक अप झालं होतं. त्यामुळं ती नैराश्यात गेली होती. शवविच्छेदन अहवालात गरोदर असल्याबाबत पुष्टी करण्यात आलेली नाही. तसंच लव्ह जिहादचाही काही अँगल नसल्याचं जाधव यांनी म्हटलं आहे. तिच्या हातावर जे बॅन्डेज लावले होते. शीझान खानला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असल्याच एसीपी जाधव यांनी म्हटलं आहे.
27 डिसेंबर रोजी तुनिषाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार
तुनिषाच्या आत्महत्येला तिचा मित्र शीझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईनं वलीव पोलीस स्थानकात केली आहे. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला अटक केली. न्यायालयाने शिझान खानला 28 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तुनिषा शर्मानं शिझान खानच्या मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. दरम्यान 27 डिसेंबर रोजी तुनिषाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
तुनिशा आणि शीझान हे दोघं सध्या सब टीव्हीच्या अलिबाबा... दास्तान-ए-काबुल या मालिकेत मुख्य भूमिकेत एकत्र काम करत होते. याच मालिकेच्या सेटवर मेकअप करतानाचा एक व्हिडीओ तुनिषानं आत्महत्येच्या काही वेळ आधी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. त्यामुळं सेटवरच्या कलाकार आणि तंत्रज्ञांसह तुनिषाच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला.
तुनिषानं गळफास घेतल्याचं लक्षात येताच, तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. दरम्यान, पाच आठवड्यांआधी तुनिषाने झीशानचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला होता. त्यात झीशान हा जीवनातला सर्वात चांगला माणूस असल्याचं तिनं लिहिलं होतं.
काल दुपारी 3 वाजताच्या सुमारास तुनिषा मेकअप रुममधील बाथरुममध्ये लटकलेल्या स्थितीत आढळून आली. त्यानंतर सहकारी कलाकारांनी तिला जवळच्या दवाखान्यात नेले. मात्र तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिस मात्र या घटनेचा आत्महत्या आणि हत्या या दोन्ही अंगानी तपास करत आहेत. दरम्यान शिझान आणि तुनिषा आपल्या इन्स्टाग्रामवर एकमेकांचे फोटो देखील शेअर करत होते. काल घटनेच्या काही तास अगोदर तुनिषानं मेकअप करत असतानाचा एक व्हिडीओ स्टोरीला ठेवला होता.
संबंधित बातम्या