एक्स्प्लोर

Emraan Hashmi Upcoming Movies : ‘टायगर 3’ ते ‘सेल्फी’, येत्या वर्षांत इमरान हाश्मीचे दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

Emraan Hashmi Upcoming Movies : इमरानकडे सध्या बॉलिवूडचे अनेक मोठे चित्रपट आहेत. येत्या वर्षांत तो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे.

Emraan Hashmi Upcoming Movies : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आज त्याचा 43वा वाढदिवस साजरा करत आहे. 2003 साली फिल्मी विश्वात एंट्री केलेल्या इमरान हाश्मीला आजघडीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.  पण, अभिनेत्याला त्याची सीरियल किसर इमेज तोडायला बरीच वर्षे लागली. सध्या, इमरान हाश्मी त्याच्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे त्याची ही प्रतिमा देखील पुसली गेली आहे आणि चित्रपट निर्माते त्याला आव्हानात्मक भूमिका देण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

गेल्या काही वर्षांत इमरानने पडद्यावर कठीण भूमिकाही साकारल्या आहेत. इमरानकडे सध्या बॉलिवूडचे अनेक मोठे चित्रपट आहेत. येत्या वर्षांत तो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे.

टायगर 3

सलमान खानच्या ‘टायगर 3’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, आता त्याचा ट्रेलर पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. या चित्रपटात सलमानच्या सोबत कतरिना कैफ दिसणार आहे. त्याचबरोबर इमरान हाश्मीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून इमरान या चित्रपटासाठी जिममध्ये खूप घाम गाळत आहे. ‘टायगर 3’मध्ये इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सब फर्स्ट क्लास है

‘सब फर्स्ट क्लास है’ हा कॉमेडी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची घोषणा 2020 मध्येच झाली होती. चित्रपटाची कथा एक सामान्य माणूस आणि त्याच्या स्वप्नांभोवती फिरते. 'सब फर्स्ट क्लास है' हा चित्रपट यावर्षी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

सेल्फी

‘सेल्फी’ या चित्रपटाद्वारे चाहत्यांना इमरान हाश्मी आणि अक्षय कुमार पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात अभिनेत्री नुसरत भरुचा आणि डायना पेंटी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘सेल्फी’ हा 2019 मल्याळम चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे.

फादर्स डे

इमरान हाश्मीच्या या आगामी चित्रपटाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. शंतनू बागची याचं दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी डिटेक्टीव्ह सूर्यकांत भांडे यांची भूमिका साकारणार आहे, ज्यांनी 120 मुलांचे अपहरण प्रकरण सोडवले होते.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
Embed widget