Interval : केवळ पाॅपकाॅर्नकरता नाही 'या' कारणामुळे मिळतो इंटरव्हल!
भारतीय लोकांना इंटरव्हलची एवढी सवय झाली आहे की, हाॅलिवूड मूव्हीच्या वेळी देखील Interval लावला जातो.
Interval : इंटरव्हलमध्ये अनेक लोक पाॅपकाॅर्न खाण्यासाठी थिएटरमधून बाहेर येतात. काही लोक याला पाॅपकाॅर्न बक पण म्हणतात. पण Interval नेमका कोणत्या कारणाने दाखवला जातो. हा ट्रेंड कशामुळे सुरु झाला. ते जाणून घेऊया.
भारतीय चित्रपटांची तुलना नेहमीच इंग्रजी चित्रपटांसोबत करण्यात येते. चित्रपटात असणारी गाणी, दिग्दर्शक, अभिनेता, सिनेमॅटोग्राफर, कॉस्ट्यूम आणि अजून बऱ्याच गोष्टींची तुलना केला जाते. पण आपण कधी चित्रपटांमध्ये Interval का असतो. याकडे लक्ष दिले नाही. हाॅलिवूड चित्रपटांमध्ये कधीच इंटरव्हल नसतो. मात्र भारतीय लोकांना इंटरव्हलची एवढी सवय झाली आहे की हाॅलिवूड चित्रपटांच्या वेळी देखील Interval दिला जातो. पाहूया भारतात इंटरव्हलचे एवढे वेड का आहे?
हॉलिवूडमध्ये का नसतो इंटरव्हल?
मूळातच हॉलिवूड चित्रपट हे मुद्देसूद मांडले जातात. तसेच हॉलिवूडमध्ये चित्रपट लिहिण्याची पद्धत फारच वेगळी आहे. हे चित्रपट 3D च्या दृष्टीने विचार करुन लिहिले जातात. पात्र पहिल्या कृतीत समोर आणले जाते. दुसऱ्यामध्ये कारण सांगितले जाते. शेवटच्या आणि तिसऱ्या कृतींमध्ये सर्व गोष्ट का घडली सांगितली जाते. त्यामुळे मध्ये ब्रेक घेण्याचे काही कारण नसते. त्यांचा चित्रपट दोन तासांपेक्षा जास्त कालावधीचा नसल्या कारणाने Interval ची काही आवश्यकता भासत नाही. चित्रपट सुरु होण्याआधी खाण्यापिण्याचाही ट्रेंड इथे आहे.
भारतामध्ये 'या' कारणाने दिला जातो इंटरव्हल
भारतामध्ये प्रत्येक चित्रपटाचा कालावधी हा दोन तासापेक्षांही जास्त असतो. ज्यामुळे Interval दिला जातो. हे खरे जरी असले तरीही यामागे एक टेक्निकल कारण आहे. पूर्वीच्या चित्रपटांमध्ये रीळचा वापर केला जात असे. त्यांच्या मदतीने चित्रपटांचे स्क्रीनिंग करण्यात येत असे. अशा स्थितीत प्रोजेक्शनिस्टला रीळ बदलण्यासाठी थोडा वेळ हवा असायचा. या कामासाठी चित्रपटाच्या मध्यभागी ब्रेक घेण्यात आला होता. त्यामुळे भारतीय चित्रपटांमध्ये एकप्रकारे इंटरव्हल आवश्यकच आहे. इंटरव्हलचा सर्वात जास्त फायदा थिएटरमधल्या लोकांना होतो. याच वेळेत चित्रपट पाहायला आलेले लोक मोठ्या प्रमाणात खाण्या-पिण्याच्या वस्तू खरेदी करतात. मात्र इंटरव्हलमध्ये होणारी कमाई हा थिएटरचा खूप मोठा भाग असतो. कारण तिकीटाचा सगळ्यात जास्त हिस्सा हा डिस्ट्रीब्यूटर आणि सरकारकडे जातो. थिएटर सुरळीतरित्या चालवण्यासाठी Interval ची कमाई गरजेची असते. हे केवळ थिएटरच्या कमाईबद्दल नाही.
भारतीय चित्रपट लिहिण्याची पद्धतही खूप वेगळी आहे. इथे मूळात चित्रपटाची कथा 3D मध्ये लिहिलेली नसते. पहिल्या भागात, पात्रांसोबत, संघर्ष देखील स्थापित केला जातो. इंटरव्हल एकप्रकारे क्लिफहॅंगर म्हणून काम करते. कथेचा वेग बदलण्यासाठी इंटरव्हलचाही वापर केला जातो.