
'मानाचा मुजरा' सोहळा गैरव्यवहार : 'टायपिंग मिस्टेक'मुळे न भरलेले 10 लाख 78 हजार रुपये तत्कालीन संचालक मंडळाला भरण्याचे आदेश
'मानाचा मुजरा' या कार्यक्रमात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत धर्मादाय सहआयुक्तांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या तत्कालीन संचालकांना 10 लाख 78 हजार रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या तत्कालीन संचालकांनी 'मानाचा मुजरा' या कार्यक्रमात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत 10 लाख 78 हजार रुपये भरण्याचे आदेश धर्मादाय सहआयुक्तांनी दिले आहेत. माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, अभिनेते विजय पाटकर, दिग्दर्शक विजय कोंडके, अभिनेत्री अलका कुबल, प्रिया बेर्डे यांच्यासह 11 जणांना हे आदेश लागू करण्यात आले आहेत. येत्या 15 दिवसात ही रक्कम भरली नाही तर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
2010 ते 2015 या कालावधीत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा 'मानाचा मुजरा' हा कार्यक्रम झाला होता. यामध्ये माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या संचालक मंडळावर घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी झालेल्या निकालामध्ये या सर्व संचालक मंडळाला 'खात्यांमधून पैसे भरा' असा आदेश दिला. मात्र टंकलेखनात झालेल्या चुकीचा फायदा उठवत हे पैसे अद्याप भरले गेले नव्हते. 'खात्यामध्ये भरा' ऐवजी 'खात्यामधून भरा' असा शब्द टाईप झाल्याने त्याचा संचालकांनी वेगळा अर्थ काढला.
अखेर धर्मादाय कार्यालयाने सोमवारी (18 जानेवारी) ही चूक दुरुस्त केली. त्यानुसार येत्या पंधरा दिवसात 2010-2015 मधील सर्व माजी संचालकांना पैसे भरण्याचे दिले. तत्कालीन संचालक मंडळाने 10 लाख 78 हजार रुपये जमा केले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत धर्मदाय सहआयुक्तांनी दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
