एक्स्प्लोर

फिरोदिया करंडकातल्या विषयांवर निर्बंध का?

पुण्यात होणारा फिरोदिया करंडक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, यंदा या करंडकामध्ये विषय सादरीकरण करताना काही विषयांना बगल देणारा नवा नियम संयोजकांनी केला आहे.

पुणे : पुण्यात होणारा फिरोदिया करंडक मिळवणं हे प्रत्येक तरूण रंगकर्मीचं स्वप्नं असतं. म्हणूनच कॉलेज विश्वात हा करंडक मिळवण्यासाठी तरूणाई जीव पणाला लावते. केवळ नाट्य नव्हे, तर गायन, वादन, चित्रकला, शिल्पकला अशा अनेक कलांचा संगम आपल्याला या स्पर्धेत पाहायला मिळतो. म्हणूनच ख्यातनाम दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी या स्पर्धेला 'सिनेमा ऑन स्टेज' असं संबोधलं होतं. तब्बल 45 वर्ष ही स्पर्धा अव्याहत सुरू आहे. विषयाचं कोणतंही बंधन आजवर या स्पर्धेने स्पर्धकांवर घातलं नव्हतं. पण इतक्या वर्षानंतर फिरोदिया करंडक पुन्हा चर्चेत आला कारण, यावेळी विषय सादरीकरण करताना काही विषयांना बगल देणारा नवा नियम संयोजकांनी केला आहे. या नव्या नियमांनुसार यंदा स्पर्धेत बाबरी मशीद, राम मंदीर, जात-धर्म, हिंदू-मुस्लीम, कलम ३७० या विषयांवर कोणत्याही प्रकारे सादरीकरण करता येणार नाही. हा नियम आला आणि नव्या वादाला सुरुवात झाली. फिरोदियामध्ये आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आहे का, सरकारी यंत्रणेच्या दबावाला बळी पडून संयोजकांनी हा नियम केला आहे का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. अनेक रंगकर्मींनी या निर्बंधांवर कडाडून टीका केली आहे. ज्येष्ठ लेखक शिरीष लाटकर, दिग्दर्शक सचिन गोस्वामी आदी अनेकांनी हा निर्णय योग्य नसल्याचे आपल्या सोशल मीडियावर म्हटले आहे. यावर फिरोदियाचे संयोजक अजिंक्य कुलकर्णी यांनी संयोजक म्हणून आपली बाजू 'एबीपी माझा'समोर मांडली आहे. 'माझा'शी बोलताना अजिंक्य म्हणाले, गेली 45 वर्ष आम्ही हा नियम केला नव्हता. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुलांना विषय हिरीरीने मांडता यावेत, आदी सगळ्या बाजू आम्हाला माहीत आहेतच. ते आवश्यकही आहे. पण आम्ही विषयांवर निर्बंध आणण्याला काही गोष्टी कारणीभून ठरल्या आहेत.' मुलांना कुठं थांबायचं कळत नाही फिरोदियामध्ये सादर होणाऱ्या कलाविष्काराला सेन्सॉर नसतं. कारण तो केवळ लेखनाचा भाग नसतो. त्यात इतरही कला असतात. या स्पर्धेत प्राथमिक फेरी होते. पण बऱ्याचदा आमच्याकडे दिलेली संहिता आणि स्टेजवर सादर होणारा आविष्कार यात फरक जाणवतो. अशावेळी ऐनवेळी संयोजक काहीच करू शकत नाहीत. सेन्सॉर नसल्यामुळे मुलांना हवा तो विषय हवा त्या पद्धतीने सादर करण्याची मुभा आहेच. पण त्याचवेळी हे स्वातंत्र्य किती घ्यायचं, कुठे थांबायचं याचं भान मुलांना नसतं. कारण ती कॉलेजविश्वातली मुलं असतात. हे तारतम्य नसल्याचे फटके अनेकदा बसले आहेत. मिटिंग घेऊनही उपयोग नाही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी आम्ही सर्व स्पर्धकांची मिटिंग घेतो. त्यात सादरीकरण करताना कोणत्या गोष्टी पाळायला हव्यात कोणत्या नाहीत ते सांगतो. पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. उदाहरणार्थ, संवादांमध्ये शिव्या येणं हे एखाद्या वेळी समजू शकतो. एकांकिकेची गरज म्हणून ते समजण्यासारखं आहे. पण आता एका एकांकिकेत 40-40 शिव्या येऊ लागल्या. यात अत्यंत अर्वाच्च शिव्यांचा समावेश होतो. रंगमंचावर जाऊन अव्याहत शिव्या देणं हे योग्य नाही. हीन शब्दात जाती-धर्मांवर टीका वारंवार सांगूनही मुलांना त्याचं गांभीर्य नसतं. अत्यंत हीन शब्दात जाती-धर्मांवर टीका होते. टीका करायला हरकत नाही. पण त्यासाठी संयत, योग्य त्या आणि तेवढ्याच भाषेचा वापर होईल, असं नसतं. स्क्रीप्ट सेन्सॉर असली की आपण सेन्सॉरला जबाबदार धरु शकतो, पण ते नसेल तर आळ संयोजनावर येतो. दरवर्षी यातून अनेक वाद उद्भवतात. हा नियम कायम नाही यंदा आम्ही हा नियम केला आहे. अर्थात तो पुढच्या वर्षी कायम असेल असं नाही. आणि करंट अफेअर्सचे विषय हवे असतील तर इतरही विषय आहेत. दुष्काळ, रस्ते, भूक, आर्थिक डबघाई यांसारखे विषय आहेतच.

महत्त्वाच्या बातम्या

अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
Embed widget