एक्स्प्लोर

Shreyas iyer: और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला

Shreyas iyer: बीसीसीआयच्या करारातून वगळलं जाणं ते त्याच बीसीसीआयने नेतृत्वाची संधी देणं इतका जिगरबाज प्रवास श्रेयसचा झाला आहे. टी-20 वर्ल्डकपसाठी निवड न होणे हा सुद्धा त्याच्यासाठी धक्का होता.

Shreyas iyer: भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरचा गेल्या चार वर्षांचा प्रवास हा एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखाच चढ-उतारांनी राहिला. दुखापतींचे मोठे संकट, संघातून बाहेर पडण्याची वेळ आणि त्यानंतर आता टीम इंडियात टी-20 कॅप्टन होत केलेले दिमाखदार पुनरागमन हा त्याचा प्रवास अत्यंत थक्क करणारा आहे. टीम इंडियाची आशियाई स्पर्धा आणि आर्यलंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी श्रेयस कॅप्टन असून सूर्यकुमार यादवची कॅप्टनसह संघातून उचलबांगडी झाली आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या करारातून वगळलं जाणं ते त्याच बीसीसीआयने नेतृत्वाची संधी देणं इतका जिगरबाज प्रवास श्रेयसचा झाला आहे. टी-20 वर्ल्डकपसाठी निवड न होणे हा सुद्धा त्याच्यासाठी धक्का होता. मात्र, त्याने आयपीएलमध्ये दिमाखदार कामगिरी करताना सुर्याची सुट्टी करून टाकली. 

गंभीर दुखापतींचे संकट आणि शस्त्रक्रिया

श्रेयस अय्यरच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण काळ 2021 मध्ये सुरू झाला, जेव्हा भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे त्याला मोठ्या काळासाठी क्रिकेटपासून दूर राहावे लागले आणि त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. या दुखापतीतून तो सावरत असतानाच, 2023 च्या सुरुवातीला त्याला पाठीच्या खालच्या भागाचा त्रास (Back Injury) सुरू झाला. हा त्रास इतका वाढला की त्याला पुन्हा एकदा शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. या काळात तो आयपीएल आणि अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मालिकांना मुकला.

बीसीसीआयचे केंद्रीय कंत्राट गमावलं

दुखापतींमुळे मैदानाबाहेर राहिल्याने श्रेयस अय्यरला केवळ शारीरिकच नाही, तर मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागले. 2024 च्या सुरुवातीला रणजी ट्रॉफी खेळण्यावरून झालेल्या वादात बीसीसीआयने (BCCI) त्याला केंद्रीय कंत्राटातून (Annual Contract) बाहेर केले. संघातून जागा जाणे आणि बोर्डाची नाराजी ओढवून घेणे हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा धक्का होता. फॉर्म आणि तंदुरुस्ती गमावल्यामुळे त्याच्या भविष्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते.

देशांतर्गत क्रिकेटमधून पुनरागमन

या सर्व संकटांनंतर श्रेयसने हार मानली नाही. त्याने स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुन्हा देशांतर्गत क्रिकेटचा मार्ग निवडला. त्याने मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी केली आणि संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा कर्णधार म्हणून त्याने अप्रतिम नेतृत्व केले. त्याच्या शांत आणि आक्रमक नेतृत्वाखाली केकेआरने 2024 चे आयपीएल विजेतेपद पटकावले, ज्यामुळे त्याचे भारतीय संघातील पुनरागमनाचे दरवाजे पुन्हा उघडले.

2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात दमदार कामगिरी

पाठीच्या गंभीर शस्त्रक्रियेनंतर थेट 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात पुनरागमन करत त्याने 11 सामन्यांत 530 धावा कुटल्या, ज्यात सलग दोन शतकांचा समावेश होता. श्रेयसची शॉर्ट-पिच (बाउन्सर) चेंडूंविरुद्ध कमकुवतपणा जगजाहीर होती. मात्र, त्याने नेट प्रॅक्टिसमध्ये कठोर परिश्रम करून या समस्येवर मात केली. आयपीएल 2024 मध्ये केकेआरला चॅम्पियन बनवून त्याने आपण केवळ एक उत्तम फलंदाज नसून एक परिपक्व कर्णधार असल्याचेही जगाला दाखवून दिले.

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Coaching Staff Future : गौतम गंभीरच्या 2 लाडक्या शिलेदारांना BCCI दाखवणार बाहेरचा रस्ता? इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियात मोठी उलथापालथ, यादीत कुणाकुणाची नावं?
गौतम गंभीरच्या 2 लाडक्या शिलेदारांना BCCI दाखवणार बाहेरचा रस्ता? इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियात मोठी उलथापालथ, यादीत कुणाकुणाची नावं?
IND Vs ENG 1st ODI : टी-20 च्या पराभवाचा हिशोब चुकता होणार! विराट-बुमराहच्या पुनरागमनाने इंग्लंड थरथरले; कधी अन् कुठे Live सामने बघायचे? जाणून घ्या A टू Z
टी-20 च्या पराभवाचा हिशोब चुकता होणार! विराट-बुमराहच्या पुनरागमनाने इंग्लंड थरथरले; कधी अन् कुठे Live सामने बघायचे? जाणून घ्या A टू Z
Rahul Dravid Coach : ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
England sacked Test coach Brendon McCullum : आधी बेन स्टोक्स गेला... आता ब्रेंडन मॅक्युलमची कोचपदावरून हकालपट्टी, इंग्लंड क्रिकेटच्या निर्णयाने जगभरात खळबळ, नेमकं काय कारण?
आधी बेन स्टोक्स गेला... आता ब्रेंडन मॅक्युलमची कोचपदावरून हकालपट्टी, इंग्लंड क्रिकेटच्या निर्णयाने जगभरात खळबळ, नेमकं काय कारण?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Rahul Dravid Coach : ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
Beed News: आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
Bollywood Song Story: माचिसच्या बॉक्सवर लावली चाल, सिगारेटच्या पाकिटावर लिहिले गेले बोल; 65 वर्षांनंतरही दिग्गजांनी रचलेल्या 'या' गाण्याची क्रेझ कायम
माचिसच्या बॉक्सवर लावली चाल, सिगारेटच्या पाकिटावर लिहिले गेले बोल; 65 वर्षांनंतरही दिग्गजांनी रचलेल्या 'या' गाण्याची क्रेझ कायम
Embed widget