The Kashmir Files : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर 'द कश्मीर फाइल्स' ओटीटीवर; 'या' प्लॅटफोर्मवर होणार रिलीज
The Kashmir Files : आता लवकरच 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर रिलीज होणार आहे.
![The Kashmir Files : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर 'द कश्मीर फाइल्स' ओटीटीवर; 'या' प्लॅटफोर्मवर होणार रिलीज the kashmir files will release soon on ott on this platform The Kashmir Files : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर 'द कश्मीर फाइल्स' ओटीटीवर; 'या' प्लॅटफोर्मवर होणार रिलीज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/1629c907cc892af5ce6aa1f580d32dfb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
The Kashmir Files : गेली काही दिवस 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. प्रेक्षक या चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आता या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होत आहेत. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर रिलीज होणार आहे.
'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाचे प्रोडक्शन झी स्टूडिओनं केलं आहे. त्यामुळे रिपोर्टनुसार, झी- 5 या ओटीटी प्लॅटफोर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटामधील काही सिन्स हे सेन्सर बॉर्डनं कट केले होते. ते सिन्स देखील प्रेक्षक ओटीटी प्लॅटफोर्मवर पाहू शकणार आहेत. 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर चार आठवड्यानंतर ओटीटीवर रिलीज करण्यात येणार होता. पण प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे ओटीटी रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. मे 2022 मध्ये हा चित्रपट टिव्हीवर टेलिकास्ट केली जाणार आहे.
'द कश्मीर फाइल्स' 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबतच दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ananya Panday : कपड्यांवरून ट्रोल झाली अनन्या पांडे , वडील चंकी पांडे आले मदतीला धावून
- Madhuri Dixit: मुंबईमध्ये माधुरीनं घेतलं आलिशान घर; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
- Runway 34 Trailer: एक विमान, खराब हवामान आणि अचानक लँडिंग! अजय देवगणच्या ‘Runway 34’चा ट्रेलर पाहिलात?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)