एक्स्प्लोर

Telly Masala : शाहरुख खान धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात ते सुभेदारांची दिवाळी सहकुटुंब साजरी होणार; जाणून घ्या मनोरंजन सृष्टीसंदर्भात महत्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Shahrukh Khan Threat: शाहरुख खान धमकी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर, संशयीताला मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात

अभिनेता शाहरुख खानला धमकी प्रकरणी आता एक मोठी बातमी समोर येत आहे. मागील आठवड्यात अभिनेता शाहरुख खानला आलेल्या धमकी प्रकरणात रायपुरमधून एका संशयित व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. फैजान खान असं या संशयित व्यक्तीचं नाव असून मुंबई पोलिसांनी आज सकाळी या व्यक्तीला धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय. बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान याला धमकी दिल्या प्रकरणात फैजान खान याला अटक करण्यासाठी ट्रांसिट डिमांड घेण्यासाठी मुंबई पोलीस सकाळी रायपुरमध्ये पोहोचले होते. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Tharla Tar Mag : अर्जुनचे प्रयत्न अन् सायलीची प्रार्थना, सुभेदारांची दिवाळी सहकुटुंब साजरी होणार

  ठरलं तर मग (Tharla Tar Mag) मालिकेत अर्जुन सायलीसाठी दिवाळीची खास भेट म्हणून मधूभाऊंना जामीनावर सोडवून आणतो. पण घरी येऊन अर्जुन सायलीला यासंदर्भात कोणतीही कल्पना देत नाही. मधूभाऊंसाठी कोर्टात युक्तिवाद करत असतानााचा सायली देवीला कौल लावते. त्याचवेळी देवीही सायलीला उजवा कौल देते. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Rupali Ganguly Notice:  'अनुपमा'चा सावत्र मुलीवर पलटवार; रुपाली गांगुलीनं धाडली 50 कोटींची मानहानीची नोटीस

अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीनं (Rupali Ganguly) सावत्र मुलीला 50 कोटीच्या मानहानीची नोटीस धाडली आहे. प्रसिद्धीसाठी ईशा वर्मानं (Isha Verma) आपली बदनामी केल्याचा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Hera Feri 3: हेरा फेरी 3 चं शुटिंग सुरु? बाबू भय्या, राजू, शामचं त्रिकूट दिसलं विमानातळावर एकत्र, सुनिल शेट्टी म्हणाला..

Hera Feri 3: हेरा फेरी या भारतीय चित्रपटाने बॉलिवूडमध्ये लाफ्टरचा डोस चाहत्यांना दियानंतर राजू, बाबुराव शामची जोडीनं लाखों लोकांच्या मनात त्यांचं विशेष स्थान निर्माण केलं आहे. काही दिवसांपूर्वी हेराफेरी 3 च्या घोषणेने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मात्र, या सिनेमाच्या कायदेशीर  विवादांनी सर्वाांनाच निराश केले.  पण आता मुंबई विमानतळावर अक्षय कुमार , परेश रावल आणि सुनिल शेट्टी एकत्र दिसल्यानं या चित्रपटाचं शुटिंग सुरु होत असल्याची चर्चा पुन्हा चाहत्यांमध्ये सुरु झाली आहे. इरॉससोबतच्या लढाईत फिरोज नाडियादवालाला हेरा फेरी ३चे हक्क परत मिळवले का अशी आशा आता पुन्हा निर्माण झाली आहे.  

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Aamir Khan : घटस्फोटानंतरही एक्स बायकोसोबत काम, आमिर खानने अखेर मौन सोडलं; म्हणाला...

 बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. आमिर (Amir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) 2021 मध्ये वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे सगळ्यांनाच धक्का बसला.  लग्नाच्या 16 वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. पण घटस्फोटानंतर आमिर आणि किरणने त्यांच्या कामावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. इतकच नव्हे तर ते दोघेही चांगले मित्र म्हणून राहिले. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Ishq 2:  27 वर्षांनंतर आमिर खान अजय देवगण पुन्हा एकत्र येणार? या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करण्यास दाखवला ग्रीन सिग्नल

आमिर खान, अजय देवगण, जुही चावला आणि काजोल यांचा 1997 मध्ये आलेला रोम-कॉम ड्रामा 'इश्क' हा अविस्मरणीय चित्रपटांपैकी एक आहे. 27 वर्षांनंतर, आमिर आणि अजय या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार का यावरून सध्या या चित्रपटाच्या संभाव्य सीक्वलची चर्चा रंगली आहे. चित्रपट निर्माते इंद्र कुमार देखील इश्क 2 साठी या दोघांना एकत्र आणण्याच्या कल्पनेबद्दल सकारात्मक असल्याचे दिसते.

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शनSantosh Deshmukh Case | आरोपींना जर सोडलं तर माझा खून करतील, मी स्वत: संपवून घेतो- धनंजय देशमुख100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDevendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Embed widget