'अनुपमा'चा सावत्र मुलीवर पलटवार; रुपाली गांगुलीनं धाडली 50 कोटींची मानहानीची नोटीस
Rupali Ganguly Notice: प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री रुपाली गांगुलीनं तिची सावत्र मुलगी ईशा वर्माला नोटीस पाठवली आहे. ईशाच्या कथित खोट्या आणि बदनामीकारक वक्तव्यांना उत्तर म्हणून रुपाली गांगुलीनं ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
Rupali Ganguly Notice to Step Daughter: अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीनं (Rupali Ganguly) सावत्र मुलीला 50 कोटीच्या मानहानीची नोटीस धाडली आहे. प्रसिद्धीसाठी ईशा वर्मानं (Isha Verma) आपली बदनामी केल्याचा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री रुपाली गांगुलीनं तिची सावत्र मुलगी ईशा वर्माला नोटीस पाठवली आहे. ईशाच्या कथित खोट्या आणि बदनामीकारक वक्तव्यांना उत्तर म्हणून रुपाली गांगुलीनं ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसमुळे तिच्या प्रतिमेवर आणि वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झाल्याचा दावा रुपालीनं केला आहे. रुपाली गांगुलीची वकील सना रईस खान यांनी पाठवलेल्या या नोटीसमध्ये तिच्या प्रतिष्ठेला झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून 50 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे.
या प्रकरणामुळे रुपाली गांगुली यांना मानसिक तणावाला सामोरं जावं लागलं, त्यासाठी तिला वैद्यकीय मदत घ्यावी लागली, असंही नोटीसमध्ये म्हटलं आहे. गांगुलीला तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मौन बाळगायचं होतं, पण तिला आणि अश्विन वर्माच्या 11 वर्षाच्या मुलाला यात ओढलं जात असल्यानं तिला हे पाऊल उचलावं लागलं, असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
रुपाली गांगुलीनं प्रसिद्ध सेलिब्रिटी वकील सना रईस खान यांच्यामार्फत ईशा वर्माला नोटीस धाडत 50 कोटी रुपयांची मागणी केली आहे. तसेच, रुपालीनं ईशाने माझी बिनशर्त जाहीर माफी मागावी, अशी मागणीदेखील या नोटीशीतून केली आहे. ईशानं असं न केल्यास कायदेशीर कारवाई करू असा इशाराही नोटीशीतून दिला आहे.
सना खान यांच्या लीगल टीमनं न्यूज18 हिंदीला दिलेल्या माहितीनुसार, ईशानं ज्यावेळी रुपालीच्या 11 वर्षाच्या मुलावर कमेंट केल्या, त्यानंतर रुपालीनं ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला. रुपालीला हे सहन होत नव्हतं. सनाच्या टीमनं कायदेशीर कारवाईमागील कारण स्पष्ट केलं आहे, "तिच्या सावत्र मुलीच्या खोट्या आणि हानिकारक वक्तव्यांना प्रतिसाद म्हणून आम्ही तिला मानहानीची नोटीस जारी केली आहे." , असं सांगण्यात आलं.
ईशा वर्माला रुपाली गांगुलीच्या इमेजचा फायदा घ्यायचाय
लीगल टीमनं न्यूज18 हिंदीला दिलेल्या माहितीनुसार, "रुपाली गांगुली प्रसिद्धीसाठी बदनामीकारक डावपेचांच्या विरोधात ठामपणे उभी आहे आणि निराधार दाव्यांपासून तिची प्रतिमा वाचवण्यासाठी ही कायदेशीर कारवाई केली आहे. रुपालीची प्रतिमा खराब करणं आणि तिच्या सार्वजनिक लोकप्रियतेचा फायदा घेणं हा या बिनबुडाच्या आरोपांचा उद्देश होता. ईशाच्या या कृतीमुळे तिची प्रतिमा तर डागाळलीच पण तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक व्यक्तिमत्त्वाचीही बदनामी झाली."
दरम्यान, या प्रकरणाची सुरुवात तेव्हा झाली, ज्यावेळी ईशा वर्मानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन रुपाली गांगुलीवर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली. ईशा वर्मानं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं होतं की, माझ्या वडिलांचं पहिलं लग्न झालं असूनही रुपाली गांगुलीचं वडिलांसोबत अफेअर होतं. तर अलिकडेच तिनं आपल्या एका पोस्टमध्ये रुपाली गांगुलीच्या 11 वर्षाच्या मुलाचाही उल्लेख केला होता, त्यामुळे रूपाली गांगुलीचा संताप वाढला होता.