Hera Feri 3: हेरा फेरी 3 चं शुटिंग सुरु? बाबू भय्या, राजू, शामचं त्रिकूट दिसलं विमानातळावर एकत्र, सुनिल शेट्टी म्हणाला..
मुंबई विमानतळावर या तिघांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनिल शेट्टी हे तिघेजण विमानतळावर एकमेकांशी बोलताना दिसत आहेत.
Hera Feri 3: हेरा फेरी या भारतीय चित्रपटाने बॉलिवूडमध्ये लाफ्टरचा डोस चाहत्यांना दियानंतर राजू, बाबुराव शामची जोडीनं लाखों लोकांच्या मनात त्यांचं विशेष स्थान निर्माण केलं आहे. काही दिवसांपूर्वी हेराफेरी 3 च्या घोषणेने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मात्र, या सिनेमाच्या कायदेशीर विवादांनी सर्वाांनाच निराश केले. पण आता मुंबई विमानतळावर अक्षय कुमार , परेश रावल आणि सुनिल शेट्टी एकत्र दिसल्यानं या चित्रपटाचं शुटिंग सुरु होत असल्याची चर्चा पुन्हा चाहत्यांमध्ये सुरु झाली आहे. इरॉससोबतच्या लढाईत फिरोज नाडियादवालाला हेरा फेरी ३चे हक्क परत मिळवले का अशी आशा आता पुन्हा निर्माण झाली आहे.
मुंबई विमानतळावर या तिघांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनिल शेट्टी हे तिघेजण विमानतळावर एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. विमानतळाबाहेरही या कलाकारांनी फोटोसाठी पोज दिली आहे. त्यांच्या एकत्र दिसल्यानं हेराफेरीच्या तिसऱ्या भागासाठी ते एकत्र आलेत का? अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरु झाली आहे.
चाहत्यांच्या चर्चेवर सुनिल शेट्टीची पोस्ट
सोशल मीडियावर नेटिझन्सने हेरा फेरी ३ सुरु झाल्याचा दावा करताना दिसल्यानं सुनिल शेट्टीनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत धुम धडाका ऑकेस्ट्रा परत एकत्र असं लिहिलंय. पण त्याखाली पण हेरा फेरीसाठी एकत्र आलो नसल्याचंही त्यानं लिहिलंय. अक्षय कुमारच्या कुडेा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी एकत्र आल्याचं त्यांनं या पोस्टमध्ये सांगितलंय. त्यामुळे हेराफेरी ३ची उत्सुकता ताणली गेली आहे हे निश्चित.
The Dhoom Dhadaka Orchestra is Back!!!
— Suniel Shetty (@SunielVShetty) November 11, 2024
But no Hera Pheri this time…just all out Kudo Action! 👊🔥
Off to the 16th Akshay Kumar Kudo International Tournament! @akshaykumar @SirPareshRawal #KifiAssociation pic.twitter.com/aHHeD4kEv7
हेरा फेरी ३ कधी?
नाडियादवाला यांनी हेरा फेरीसह काही लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली, परंतु इरॉसबरोबरच्या कायदेशीर विवादांमुळे त्यांना फ्रेंचायझी सुरू ठेवण्यापासून रोखण्यात आले. नाडियादवाला यांनी इरॉसची सर्व कर्जे माफ करत कोर्टाकडून 'नो ड्यू सर्टिफिकेट' मिळवले आणि फ्रँचायझींचे हक्क परत मिळवले आहेत.
आता या सिनेमाचे सर्व कायदेशीर अडथळे दूर झाले आहेत, त्यामुळे हेरा फेरी 3 मधील हे त्रिकूट कधी एकत्र येतंय याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.