एक्स्प्लोर

Telly Masala : मकरंद अनासपुरे CM झाल्यास कोणता निर्णय घेणार ते कलर्स मराठीवरील ही मालिका जाणार ऑफएअर; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Marathi Serial Updates : 'सुख कळले'साठी कलर्स मराठीवरील 'ही 'मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकार भावूक

Marathi Serial Updates :  मराठीतील छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीसाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे. टीआरपीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी वाहिन्यांकडून नवनवीन प्रयोग सुरू आहेत. स्टार प्रवाह (Star Pravah), झी मराठी (Zee Marathi) आणि कलर्स मराठीवर (Colours Marathi) नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. नव्या मालिकांसाठी आता  काही मालिका ऑफएअर जात आहेत. कलर्स मराठीवर 'इंद्रायणी' नंतर आता 'सुख कळले' ही मालिका आणि ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ हा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'सुख कळले' या मालिकेसाठी आता कलर्स मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका निरोप घेणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

 

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चनच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाने सनी देओलचे नशीब पालटलं!


Amitabh Bachchan Sunny Deol : दिग्दर्शक मनमोहन देसाई (Manmohan Desai) यांनी आपल्या सिने कारकिर्दीत अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. त्याशिवाय, काही चित्रपट हे आजही लोकप्रिय आहेत. मनमोहन देसाई यांनी अॅक्शन, क्राईम, थ्रिलर, लव्ह स्टोरी अशा विविध धाटणीचे चित्रपट केले. त्यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत सर्वाधिक चित्रपट केले. बहुतांशी चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

OTT Release This Week : आर्टिकल 370 , सायलेन्स 2; ओटीटीवर 'या' आठवड्यात काय पाहाल?


वीकेंडच्या सुट्टीच्या दिवशी घरी थांबून ओटीटीवर चित्रपट, वेब सीरिज पाहणार असाल तर तुम्हाला चांगला पर्याय मिळणार आहे. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची संधी हुकली असेल तर या आठवड्यात ओटीटीवर तुम्हाला थिएटरमध्ये धुमाकूळ घालणारा चित्रपट पाहता येणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Makarand Anaspure : एक दिवसाचा मुख्यमंत्री झाल्यास काय करणार? मकरंद अनासपुरेच्या उत्तराने कराल कौतुक


Makarand Anaspure :  राज्यासह देशभरात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. राजकीय प्रचारात आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा उडाला आहे. प्रत्येक उमेदवार, राजकीय पक्ष आश्वासने देत आहेत. सत्तेत आल्यानंतर काय करू याचे दावे, आश्वासने देत आहेत. सत्तेची सूत्रे  हाती आली तर आपण बदल करू असे राजकारण्यांसह सगळ्यांना वाटते. अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांना एक दिवसाचा मुख्यमंत्री केल्यावर काय करणार, असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी दिलेल्या उत्तरावर तु्म्ही त्यांचे कौतुक कराल. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

प्रसिद्ध यु्ट्युबरचे 27 व्या वर्षी निधन; नुकतीच झाली होती शस्त्रक्रिया

Angry Rantman Abhradeep Saha Dies : सोशल मीडिया सेन्सेशन आणि अँग्री रेंटमॅन म्हणून ओळखले जाणारा युट्युबर अभिदीप साहा याचे वयाच्या 27 व्या वर्षी निधन (Angry Rantman Abhradeep Saha Dies) झाले. त्याच्या कुटुंबीयांनी बुधवारी ही माहिती दिली. अभिदीपच्या  कुटुंबीयांनी फेसबुक पोस्टद्वारे त्याच्या निधनाची माहिती दिली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Dibakar Banerjee on Sushant Singh Rajput Death : तो एक आऊटसाइडर होता, त्याचा मृत्यू झाला तेव्हा...;सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर दिबाकर बॅनर्जीने काय म्हटले?


Dibakar Banerjee on Sushant Singh Rajput Death :  दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी (Dibakar Banerjee) सध्या त्यांच्या 'लव्ह सेक्स और धोखा-2' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट 19 एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या त्याचे प्रमोशन सुरू आहे. दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत दिबाकरने दिवगंत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनावर भाष्य केले आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर सुरू असलेल्या आरोपांवरही दिबाकरने मनातील खदखद बोलून दाखवली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

श्रीकांत भोसले
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सलीम खान यांची प्रकृती नाजूक, तब्येतीबाबत डॉक्टरांची पहिली प्रतिक्रिया; मेडिकल बुलेटीन देणार
सलीम खान यांची प्रकृती नाजूक, तब्येतीबाबत डॉक्टरांची पहिली प्रतिक्रिया; मेडिकल बुलेटीन देणार
संविधानाची ताकद दाखवणारा ‘कलम का बादशाह’ येतोय; मोनालिसा बागलचा दमदार कमबॅक!
संविधानाची ताकद दाखवणारा ‘कलम का बादशाह’ येतोय; मोनालिसा बागलचा दमदार कमबॅक!
मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, इम्रान हाशमीसोबत केलेलं शेवटचं काम
मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, इम्रान हाशमीसोबत केलेलं शेवटचं काम
फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांना भेटला मि. इंडिया; अनिल कपूर, रिचा चड्डासह बॉलिवूड कलाकारांशी आपुलकीचा संवाद, काय चर्चा?
फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांना भेटला मि. इंडिया; अनिल कपूर, रिचा चड्डासह बॉलिवूड कलाकारांशी आपुलकीचा संवाद, काय चर्चा?

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
Rohit Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करतायत, आमदारांनाही धमकावलं? रोहित पवारांचा खळबळनजक दावा
राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
Embed widget