एक्स्प्लोर

Airoli-Katai Naka Freeway: नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?

Airoli-Katai Naka Freeway: ऐरोली-कटाई नाका उन्नत मार्ग जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या प्रकल्पाचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.

Airoli Katai Naka Freeway: वाहतूक कोंडी काही मुंबईकरांना नवी नाही. कार्यालयीन वेळा, शालेय बस, जड वाहने आणि सतत वाढणारी लोकसंख्या यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीदरम्यानचा प्रवास अधिकच त्रासदायक ठरत आहे. मात्र, आता या त्रासातून मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात सुटका करणारी बातमी समोर आली आहे. एमएमआरडीएकडून (MMRDA) उभारण्यात येणारा ऐरोली-कटाई नाका उन्नत मार्ग जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या प्रकल्पाचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. 2018 मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. 

नवी मुंबई ते कल्याण- डोंबिवली प्रवास अवघ्या 15 मिनिटांत होणार 

हा फ्रीवे सुरू झाल्यानंतर नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली दरम्यानचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे. सध्या याच मार्गासाठी वाहनचालकांना ठाणे, मुंब्रा आणि दिवा परिसरातील प्रचंड ट्रॅफिकला सामोरे जावे लागते. ऐरोली-कटाई नाका मार्ग सुरू झाल्यावर मुंबईहून कल्याणकडे जाणाऱ्या आणि कल्याणहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांना थेट आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे.

या मार्गाची वैशिष्टये काय?

हा प्रकल्प मूळ ऐरोली-मुंब्रा उन्नत मार्गाचा विस्तार असून, देसाई खाडीवरून जाणारा रस्ता आणि पारसिक डोंगरातून जाणारा भुयारी बोगदा ही या मार्गाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. 2018 मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. एकूण 6.71 किमी लांबीच्या या मार्गामध्ये दोन टप्प्यांत काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे-बेलापूर मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पर्यंत उन्नत रस्ता तयार करण्यात येत आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ऐरोली पुलापासून ठाणे-बेलापूर मार्गावरील भारत बिजली परिसरापर्यंत जोड रस्ता उभारण्यात येत आहे.

4 भुयारी बोगदे, वाहनांची गर्दी होणार कमी

या फ्रीवेवर चार-चार मार्गिकांचा भुयारी बोगदा असणार असून, त्यामुळे जड वाहनांची गर्दी ऐरोली आणि ठाणे परिसरातून कमी होईल. परिणामी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील अंतर्गत रस्त्यांवरील ताण मोठ्या प्रमाणात घटेल. वेळेची बचत, इंधन खर्चात कपात आणि प्रदूषण कमी होण्यासही मदत होणार आहे. एमएमआरडीएच्या माहितीनुसार, काम नियोजनानुसार सुरू असून वर्षाअखेरीस हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. हा फ्रीवे सुरू झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान, सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
Virat Kohli Meets Eknath Shinde : लंडनमध्ये विराट कोहलीचा मराठमोळा सन्मान; एकनाथ शिंदेंनी शाल-पुष्पगुच्छ देत केला सत्कार, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? पाहा VIDEO
लंडनमध्ये विराट कोहलीचा मराठमोळा सन्मान; एकनाथ शिंदेंनी शाल-पुष्पगुच्छ देत केला सत्कार, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? पाहा VIDEO
मराठा बांधवांना अंतरवालीत येण्याचं आवाहन, मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय, न्यायदेवता ते सरकार नेमकं काय म्हणाले पाटील?
मराठा बांधवांना अंतरवालीत येण्याचं आवाहन, मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय, न्यायदेवता ते सरकार नेमकं काय म्हणाले पाटील?
साखर आणि तेलानंतर आता कांद्याच्या दरात मोठी वाढ, पण शेतकऱ्यांना फायदा मिळतोय का? प्रति किलोसाठी किती दर? 
साखर आणि तेलानंतर आता कांद्याच्या दरात मोठी वाढ, पण शेतकऱ्यांना फायदा मिळतोय का? प्रति किलोसाठी किती दर? 

व्हिडीओ

Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
Video: 'थार-फॉर्च्युनरने भाईगिरी चालणार नाही, गुंडागर्दी दाखण्यासाठी ती कार नाही..' कलेक्टरांनी शेकडो मालक आणि चालक एकत्र करत चक्क सुरक्षेची शपथ घ्यायला लावली!
Video: 'थार-फॉर्च्युनरने भाईगिरी चालणार नाही, गुंडागर्दी दाखण्यासाठी ती कार नाही..' कलेक्टरांनी शेकडो मालक आणि चालक एकत्र करत चक्क सुरक्षेची शपथ घ्यायला लावली!
Share Market Crash : शेअर बाजारात घसरण सुरुच, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, तब्बल 3.5 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण सुरुच, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, तब्बल 3.5 लाख कोटी बुडाले
Sangli Crime: जत तालुक्यात ट्रकसमोर अचानक स्कार्पिओ आडवी लावून व्यापाऱ्यांवर सशस्त्र दरोडा; बंदुकीचा धाक दाखवत 20 लाखांची रोकड, 2 तोळे सोनं लुटलं
जत तालुक्यात ट्रकसमोर अचानक स्कार्पिओ आडवी लावून व्यापाऱ्यांवर सशस्त्र दरोडा; बंदुकीचा धाक दाखवत 20 लाखांची रोकड, 2 तोळे सोनं लुटलं
Rohit Gavit : मोठी बातमी, शिवसेना आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला पोलिसांकडून अटक, पालघरमधील रुग्णालयातील मारहाण प्रकरण भोवलं
राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला पोलिसांकडून अटक, पालघरमधील रुग्णालयातील मारहाण प्रकरण भोवलं
संभाजी ब्रिगेडने MPSC सचिवांना कार्यालयात घुसून काळं फासलं, गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून कारवाईचा इशारा
संभाजी ब्रिगेडने MPSC सचिवांना कार्यालयात घुसून काळं फासलं, गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून कारवाईचा इशारा
BRICS :  ब्रिक्स सदस्यांसमोर भारतानं ट्रेड प्लॅन मांडला, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत मंडपम इथं दाखल, मोदींसोबत चर्चा सुरु
ब्रिक्स सदस्यांसमोर भारतानं ट्रेड प्लॅन मांडला, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत मंडपम इथं दाखल, मोदींसोबत चर्चा सुरु
What Is BRICS : ब्रिक्स म्हणजे नेमकं काय? भारत, चीन, रशिया आणि... ट्रम्प यांची धाकधूक वाढवणाऱ्या BRICS मध्ये कोण-कोणते देश आहेत सदस्य? जाणून घ्या सर्वकाही
ब्रिक्स म्हणजे नेमकं काय? भारत, चीन, रशिया आणि... ट्रम्प यांची धाकधूक वाढवणाऱ्या BRICS मध्ये कोण-कोणते देश आहेत सदस्य? जाणून घ्या सर्वकाही
Embed widget