एक्स्प्लोर

Makarand Anaspure : एक दिवसाचा मुख्यमंत्री झाल्यास काय करणार? मकरंद अनासपुरेच्या उत्तराने कराल कौतुक

Makarand Anaspure :  अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांना एक दिवसाचा मुख्यमंत्री केल्यावर काय करणार, असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी दिलेल्या उत्तरावर तु्म्ही त्यांचे कौतुक कराल. 

Makarand Anaspure :  राज्यासह देशभरात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. राजकीय प्रचारात आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा उडाला आहे. प्रत्येक उमेदवार, राजकीय पक्ष आश्वासने देत आहेत. सत्तेत आल्यानंतर काय करू याचे दावे, आश्वासने देत आहेत. सत्तेची सूत्रे  हाती आली तर आपण बदल करू असे राजकारण्यांसह सगळ्यांना वाटते. अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांना एक दिवसाचा मुख्यमंत्री केल्यावर काय करणार, असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी दिलेल्या उत्तरावर तु्म्ही त्यांचे कौतुक कराल. 

मकरंद अनासपुरे यांचा 'राजकारण गेलं मिशीत'हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने मकरंद अनासपुरे यांनी 'एबीपी माझा'सोबत बोलताना मकरंद अनासपुरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. मकरंद अनासपुरे यांना राजकारण, सध्या असलेली राजकीय परिस्थितीवर प्रश्न विचारण्यात आले होते. 

एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो तर...

मकरंद अनासपुरे हे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. सामाजिक-राजकीय विषयांवरही ते भाष्य करतात. एक दिवसाचा मुख्यमंत्री झाला तर काय कराल, असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सगळ्यात आधी मी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेईल असे उत्तर दिले. त्याशिवाय, दुसरा निर्णय हा शेतकऱ्यांच्या विरोधात असणारे कायदे तात्काळ रद्द करू असे मकरंद अनासपुरे यांनी म्हटले. डॉ. स्वामीनाथन आयोगाने शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याबाबतच्या शिफारसी केल्या होत्या. डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींवर राजकीय पक्षांनी अनेकदा आश्वासने दिली. मात्र, उत्पादन खर्चावर शेतमालाला हमीभाव हा कागदावरच राहिला. 

शेतमालाच्या हमी भावासाठी शेतकरी संघटनांकडून सातत्याने आंदोलने सुरू आहेत. एका बाजूला शेतीचा उत्पादन खर्च वाढत असताना दुसरीकडे शेतमालाला त्यानुसार भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अरिष्टात अडकला आहे. देशात लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नैसर्गिक संकट, शेत मालाला हमीभाव नसणे तर दुसरीकडे वीज, खतांची दरवाढीसह उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्याचे आर्थिक गणित बिघडलं आहे. 

ही मतदारांची फसवणूक असल्याचा प्रकार आहे...

मकरंद अनासपुरे यांना सध्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींबाबत विचारले असता त्यांनी  परखड मत व्यक्त केले. सध्या सुरू असलेला प्रकार हा आम्हा मतदारांची फसवणूक असल्यासारखे वाटते, असे  मकरंद अनासपुरे यांनी म्हटले. मतदान करताना तो उमेदवार, व्यक्ती पाहून मत दिले असते. आता, ज्याच्यावर विश्वास ठेवून मतदान केले असते त्या माणसाने कोलांटउडी मारल्यानंतर फसवणूक झाल्यासाऱखी वाटते, असे त्यांनी म्हटले. महाराष्ट्राचे भवितव्य हे तरुणाईच्या हाती असल्याचे त्यांनी म्हटले.

कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, नाना पाटेकर यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मकरंद अनासपुरे यांनी निवडणुकीवर भाष्य केले. मला लोकांच्या मनाच्या मतदारसंघाची निवडणूक लढवण्यास आवडेल असे मकरंद अनासपुरे यांनी सांगितले. 

पाहा व्हिडीओ :Makarand Anaspure interview : Sharad Pawar की Uddhav Thackeray, मकरंद अनासपुरे कुणाच्या बाजूने?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget