एक्स्प्लोर

Marathi Serial Updates : 'सुख कळले'साठी कलर्स मराठीवरील 'ही 'मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकार भावूक

Marathi Serial Updates : नव्या मालिकांसाठी आता काही मालिका ऑफएअर जात आहेत. कलर्स मराठीवर इंद्रायणी नंतर आता 'सुख कळले' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून सध्या सुरू असलेली एक मालिका ऑफ एअर जाणार आहे.

Marathi Serial Updates :  मराठीतील छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीसाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे. टीआरपीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी वाहिन्यांकडून नवनवीन प्रयोग सुरू आहेत. स्टार प्रवाह (Star Pravah), झी मराठी (Zee Marathi) आणि कलर्स मराठीवर (Colours Marathi) नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. नव्या मालिकांसाठी आता  काही मालिका ऑफएअर जात आहेत. कलर्स मराठीवर 'इंद्रायणी' नंतर आता 'सुख कळले' ही मालिका आणि ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ हा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'सुख कळले' या मालिकेसाठी आता कलर्स मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका निरोप घेणार आहे. 

पुढील आठवड्यात, 22 एप्रिलपासून सागर देशमुख आणि स्पृहा जोशीची मुख्य भूमिका असलेली 'सुख कळले' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका रात्री 9 वाजता प्रसारीत होणार आहे. तर, 'रमा राघव' या मालिकेची वेळ 9.30 वाजता करण्यात आली आहे. तर, 9.30 वाजता प्रसारीत केली जाणारी मालिका 'भाग्य दिले तू मला'ही मालिका ऑफएअर जाणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by @colorsmarathi

जवळपास दोन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.  मालिकेतील राज-कावेरीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. आता, ही मालिका ऑफएअर जाणार आहे. या मालिकेचा शेवटचा एपिसोड या आठवड्यात प्रसारीत होणार असून मालिकेची व्रॅपअप पार्टी पार पडली. शूटिंगच्या शेवटच्या दिवसाच्या पार्टीला सगळेच कलाकार भावूक झाले. 

View this post on Instagram
 
A post shared by BHAGYASHREE DALVI🌼 (@bhagyashri2468)

'सुख कळले'ची उत्सुकता...

'सुख कळले' (Sukh Kalale) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत स्पृहा जोशी (Spruha Joshi) आणि सागर देशमुख (Sagar Deshmukh) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  अभिनेता सागर देशमुख ही या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. स्पृहा जोशी जवळपास वर्षभरानंतर मालिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आता ही मालिका कशी असणार, याची उत्सुकता लागली आहे. 

इतर संबंधित बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bangladesh Election Result 2026: इकडं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात अन् तिकडं तारिक रहमान यांच्या शपथविधीला पीएम मोदी बांगलादेशला जाणार की नाहीत?
इकडं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात अन् तिकडं तारिक रहमान यांच्या शपथविधीला पीएम मोदी बांगलादेशला जाणार की नाहीत?
Akola Crime: संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
आयोजकांकडून 17 दिवसांच्या गेमसाठी 10 हजार मोफत कंडोमची विशेष सोय, पण तीन दिवसात अख्खा स्टाॅक संपला!
आयोजकांकडून 17 दिवसांच्या गेमसाठी 10 हजार मोफत कंडोमची विशेष सोय, पण तीन दिवसात अख्खा स्टाॅक संपला!
Narhari Zirval: मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश

व्हिडीओ

Akbaruddin Owaisi : हा देश कोणाच्या बापाचा नाही, अकबरुद्दीन ओवैसींचा मोदींवर निशाणा
Sanjay Raut PC : पाकिस्तान टिपू सुलतानाला हिरो मानतं तर त्यांच्यासोबत क्रिकेट कसं खेळू शकता
Raghuvir Khedkar Majha Katta: डीजे,लावण्यांचं आक्रमण तमाशाच्या मुळावर? रघुवीर खेडकरांचा 'माझा कट्टा'
Jayant patil on Ajit pawar : माझी आणि दादा यांची 11 वेळा भेट झाली होती, विलिनीकरणावर जयंत पाटील काय म्हणाले?
Harshwardhan Sakpal vs Devendra Fadnavis on Tipu Sultan : टिपू सुलतानवरुन टीकेची तलवार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bangladesh Election Result 2026: इकडं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात अन् तिकडं तारिक रहमान यांच्या शपथविधीला पीएम मोदी बांगलादेशला जाणार की नाहीत?
इकडं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात अन् तिकडं तारिक रहमान यांच्या शपथविधीला पीएम मोदी बांगलादेशला जाणार की नाहीत?
Akola Crime: संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
आयोजकांकडून 17 दिवसांच्या गेमसाठी 10 हजार मोफत कंडोमची विशेष सोय, पण तीन दिवसात अख्खा स्टाॅक संपला!
आयोजकांकडून 17 दिवसांच्या गेमसाठी 10 हजार मोफत कंडोमची विशेष सोय, पण तीन दिवसात अख्खा स्टाॅक संपला!
Narhari Zirval: मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका
'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका
Maharashtra ATS Action: राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र, यवतमाळमध्ये 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं कारण काय?
राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र, यवतमाळमध्ये 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं कारण काय?
India Vs Pakistan: टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे 6 धुरंदर आज पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात हायव्होल्टेज थरार प्रत्यक्ष मैदानात अनुभवणार!
टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे 6 धुरंदर आज पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात हायव्होल्टेज थरार प्रत्यक्ष मैदानात अनुभवणार!
तमन्ना भाटियासोबत ब्रेकअप, विजय वर्मा पुन्हा प्रेमात पडला? 'त्या' पोस्टनं वेधलं लक्ष, खुशीच्या हातात हात अन्...
तमन्ना भाटियासोबत ब्रेकअप, विजय वर्मा पुन्हा प्रेमात पडला? 'त्या' पोस्टनं वेधलं लक्ष, खुशीच्या हातात हात अन्...
Embed widget