Angry Rantman Abhradeep Saha Dies : प्रसिद्ध यु्ट्युबरचे 27 व्या वर्षी निधन; नुकतीच झाली होती शस्त्रक्रिया
Angry Rantman Abhradeep Saha Dies : सोशल मीडिया सेन्सेशन आणि अँग्री रेंटमॅन म्हणून ओळखले जाणारा YouTuber अभिदीप साहा याचे वयाच्या 27 व्या वर्षी निधन झाले
Angry Rantman Abhradeep Saha Dies : सोशल मीडिया सेन्सेशन आणि अँग्री रेंटमॅन म्हणून ओळखले जाणारा युट्युबर अभिदीप साहा याचे वयाच्या 27 व्या वर्षी निधन (Angry Rantman Abhradeep Saha Dies) झाले. त्याच्या कुटुंबीयांनी बुधवारी ही माहिती दिली. अभिदीपच्या कुटुंबीयांनी फेसबुक पोस्टद्वारे त्याच्या निधनाची माहिती दिली.
बुधवारी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, आम्ही आज सकाळी 10:18 वाजता अभिदीप साहा उर्फ अँग्रीरेंटमॅन यांचे निधन झाल्याची घोषणा करत आहोत." त्याने आपल्या प्रामाणिकपणाने, विनोदाने आणि अविचल भावनेने लाखो लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकला. त्याची खूप आठवण येईल, असा शोकाकुल संदेश त्याच्या कुटुंबीयांनी लिहिला.
View this post on Instagram
मल्टिपल ऑर्गन फेल्यूअर झाल्याने निधन
कंटेंट क्रिएटर असणारा अभिदीप साहा हा कोलकाताचा रहिवासी होता. गेल्या महिन्यात त्याला बेंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र या आठवड्यात त्यांची प्रकृती खालावली. प्रकृती खालावल्याने तो व्हेंटिलिटरवर होता. मात्र, त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
View this post on Instagram
साहा हा चेल्सी संघाचा चाहता होता. इंग्लिश प्रीमियर लीग क्लबवर त्याचे 'नो पॅशन, नो व्हिजन' ही लाईन व्हायरल झाल्यानंतर 2017 मध्ये तो लोकप्रिय झाला. तेव्हापासून साहाने त्याच्या यूट्यूब चॅनलवर क्रीडा आणि चित्रपटांशी संबंधित अनेक व्हिडिओ बनवले आहेत. यूट्यूबवर त्यांचे 4.8 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याचा पहिला व्हिडीओ ॲनाबेल चित्रपटावर होता. ज्याचे शीर्षक 'मी ॲनाबेल हा चित्रपट का पाहणार नाही?' असे होते.
इंडियन सुपर लीगच्या (ISL) अनेक फुटबॉल क्लबांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे साहाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. बेंगळुरू एफसीने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, “भारतीय फुटबॉल निष्ठावंत अभ्रदीप साहा यांच्या निधनाबद्दल BFC कुटुंबाला दुःख झाले आहे. अभ्रदीपच्या खेळावरील प्रेमाला सीमा नव्हती. त्याची आवड आणि उत्साह चुकला जाईल. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.