एक्स्प्लोर

OTT Release This Week : आर्टिकल 370 , सायलेन्स 2; ओटीटीवर 'या' आठवड्यात काय पाहाल?

OTT Release This Week : एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात ओटीटीवर चांगले चित्रपट, वेब सीरिज रिलीज होणार आहेत. पाहुयात या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणाऱ्या चित्रपटांची यादी...

OTT Release This Week :   वीकेंडच्या सुट्टीच्या दिवशी घरी थांबून ओटीटीवर चित्रपट, वेब सीरिज पाहणार असाल तर तुम्हाला चांगला पर्याय मिळणार आहे. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची संधी हुकली असेल तर या आठवड्यात ओटीटीवर तुम्हाला थिएटरमध्ये धुमाकूळ घालणारा चित्रपट पाहता येणार आहे. 

एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात ओटीटीवर चांगले चित्रपट, वेब सीरिज रिलीज होणार आहेत. पाहुयात या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणाऱ्या चित्रपटांची यादी... 

आर्टिकल 370 

जम्मू-काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद 370 रद्द करण्याचा सरकारचा निर्णय, दहशतवादी कारवाया, सुरक्षा यंत्रणांचा तपास अशा मुद्यांभोवती चित्रपटाचे कथानक आहे. चित्रपटात यामी गौतम मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाने थिएटरमध्ये चांगली कमाई केली होती. 

सायलेन्स- 2

'सायलेन्स 2' हा चित्रपट मर्डर मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये अभिनेता मनोज वाजपेयी हा एसीपी अविनाशच्या भूमिकेत आहे. प्राची देसाईदेखील या चित्रपटात आहे.  'सायलेन्स' हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता  'सायलेन्स 2'कडून प्रेक्षकांना अपेक्षा आहेत. चित्रपटगृहात प्रदर्शित न होता थेट ओटीटीवर प्रदर्शित होणारा हा मनोजचा पाचवा चित्रपट आहे. 

ड्यून 2 

'ड्यून 2' हा चित्रपट सध्या रेंटल स्कीमनुसार उपलब्ध होणार आहे. या चित्रपटासाठी प्राइम सदस्यांनादेखील रक्कम खर्च करावी लागणार आहे. 'ड्यून 2' हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. 

द टुरिस्ट सीझन 2

'द टुरिस्ट सीझन 2' ही सीरिज एका आयरिश व्यक्तीच्या अवतीभवती फिरतो. एका ऑस्ट्रेलियन रुग्णालयात स्मृतीभ्रंशाने आजारी होतो. आपल्या ओळख, जुन्या आठवणी जागवण्याच्या प्रयत्नात त्याला त्याच्या भूतकाळातील काळ्या आठवणींना सामोरे जावे लागते. या सीरिजमध्ये जेमी डोर्नन मुख्य भूमिकेत आहे. ही वेब सीरिज 19 एप्रिल रोजी लायन्सगेट प्लेवर रिलीज होणार आहे. 

सी यू इन अनदर लाईफ 

ही स्पॅनिश क्राईम ड्रामा मिनी सीरिज आहे. या सीरिजमधील कथा एका सत्य घटनेवर आधारीत आहे.  सी यू इन अनदर लाइफ ही सीरिज 17 एप्रिलपासूनच डिस्नी प्लस हॉटस्टार प्रदर्शित झाली आहे. 

ड्रीम सिनेरियो

'ड्रीम सिनेरियो'  क्रिस्टोफर बोर्गली यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला 2023 सालचा अमेरिकन ब्लॅक कॉमेडी काल्पनिक चित्रपट आहे. एका शास्त्रज्ञाच्या स्वप्नात  अचानकपणे हजारो लोक स्वप्नात दिसू लागतात, त्यानंतर त्याच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडतात. 

सायरन

'सायरन' हा चित्रपट एका रुग्णवाहिकेच्या चालकाच्या अवतीभवती फिरणारा आहे. हा रुग्णवाहिकेचा चालक एका गुन्ह्यात तुरुंगात अडकतो आणि तुरुंगातून सुटका होण्याची प्रतिक्षा करत असतो. मात्र, यामध्ये 14 वर्षांचा कालावधी लागतो. 'सायरन' हा चित्रपट 19 एप्रिल  रोजी डिस्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Adinath Kothare: 4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
Shweta Tiwari: मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? घाणेरड्या भाषेतील कमेंट अन् मेसेजवर अभिनेत्री श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? घाणेरड्या भाषेतील कमेंट अन् मेसेजवर अभिनेत्री श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
OTT Thriller Movie: 2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म
2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Embed widget