Telly Masala : ठरलं तर मग मालिकेत मैत्रीच्या नात्याची परीक्षा, साक्षीमुळे दुरवणार का अर्जुन - चैतन्य? ते दंगलमधील 'छोटी बबीता' सुहानी भटनागरचे निधन; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Tharla Tar Mag : ठरलं तर मग मालिकेत मैत्रीच्या नात्याची परीक्षा, साक्षीमुळे दुरवणार का अर्जुन - चैतन्य?
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा एकदा 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) मालिकेने बाजी मारली आहे. मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. मालिकेच्या सुरुवातीपासूनच अनेक रंजक वळण घेत मालिकेत सध्या अनेक घडामोडी घडत आहे. तसेच आता साक्षीमुळे अर्जुन आणि चैतन्य यांच्या मैत्रीतही दुरावा आल्याचं पाहायला मिळतंय.
बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा
Suhani Bhatnagar Passed Away: दंगलमधील 'छोटी बबीता' सुहानी भटनागरचे निधन, अवघ्या 19 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
आमिर खानचा (Amir Khan) सुपरहिट चित्रपट 'दंगल'मध्ये (Dangal) छोट्या बबिता फोगटची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे वयाच्या 19 व्या वर्षी निधन झाले असल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेत्री सुहानी भटनागर (Suhani Bhatnagar) असं या अभिनेत्रीचं नाव असून ती काही काळ आजाराशी झुंज देत होती. एम्समध्येही तिच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुनही तिला वाचवण्यात यश आले नाही. 17 फेब्रुवारी 2024 रोजी सुहानीचा मृत्यू झाला.
बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा
Indrayani Colours Marathi Serial : कलर्स मराठीवर 'इंद्रायणी' मालिकेचा नवा प्रोमो, संदीप पाठक - अनिता दाते प्रमुख भूमिकेत, भरत जाधवही मालिकेत दिसणार?
'कलर्स मराठी' (Colours Marathi) वाहिनीवर 'इंद्रायणी' (Indrayani) ही मालिका 25 मार्च पासून सुरु होणार आहे. केदार शिंदे यांचे दिग्दर्शन असलेली ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत संदीप पाठकसह अनिता दाते केळकर देखील झळकणार आहे. झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेनंतर राधिका पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच वाहिनीकडून करण्यात आलेल्या एका पोस्टमुळे भरत जाधवही या मालिकेत दिसणार का प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडला आहे.
बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा
Aai Kuthe Kay Karte : मालिका बंद होण्याच्या चर्चांना पूर्णविराम! पण संध्याकाळचा मेन स्लॉट नाही, 'आई कुठे काय करते' येणार 'या' वेळेत भेटीला
'स्टार प्रवाह' (Star Pravah) वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका आता संपणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून होत्या. सुरुवातीच्या काळात टीआरपीमध्ये अव्वल असणारी ही मालिका आता बंद होणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण आता ही मालिका बंद होणार नसल्याचं समोर आलं असून मालिका आता नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा
Shiva Zee Marathi Serial : आशुतोषची भेट त्याच्या स्वप्नसुंदरीशी होणार? झी मराठीवरील 'शिवा' मालिकेत वाहतायत प्रेमाचे वारे
टीआरपीमध्ये पुन्हा एकदा वर येण्यासाठी झी मराठीकडून (Zee Marathi) नव्या मालिकांचा ओघ सुरु झालाय. काही दिवसांपूर्वी झी मराठीवर शिवा (Shiva) आणि पारु (Paru) या दोन मालिका सुरु झाल्या. पण मालिकेच्या सुरुवातीलाच दाखवलेल्या दृष्यांमुळे या मालिका चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. सध्या शिवा या मालिकेत प्रेमाचे वारे वाहू लागले असून आशुतोषला त्याची स्वप्नसुंदरी भेटणार का हे स्पष्ट होणार आहे.
बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा
Prasad Oak Birthday : जागा हो, तुझ्याकडे यावर पर्याय नाही..., वाढदिवसानिमित्त प्रसादला बायकोने दिल्या अनोख्या शुभेच्छा
अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकचा (Prasad Oak) आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची बायको मंजिरी ओक (Manjiri Oak) हिने एक पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मंजिरीने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी देखील कमेंट्स करत प्रसादला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मंजिरी आणि प्रसाद ओक यांनी नुकतच त्यांच्या नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तसेच आता प्रसादच्या वाढदिवसानिमित्त देखील मंजिरीची पोस्ट चर्चेत आली आहे.
बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा