एक्स्प्लोर

Shiva Zee Marathi Serial : आशुतोषची भेट त्याच्या स्वप्नसुंदरीशी होणार? झी मराठीवरील 'शिवा' मालिकेत वाहतायत प्रेमाचे वारे

Shiva Zee Marathi Serial : झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली शिवा ही मालिका चांगलीच चर्चेत आली आहे. तर आता आशुतोषला त्याची स्वप्नसुंदरी भेटणार का हे येत्या भागात कळणार आहे.

Shiva Zee Marathi Serial : टीआरपीमध्ये पुन्हा एकदा वर येण्यासाठी झी मराठीकडून (Zee Marathi) नव्या मालिकांचा ओघ सुरु झालाय. काही दिवसांपूर्वी झी मराठीवर शिवा (Shiva) आणि पारु (Paru) या दोन मालिका सुरु झाल्या. पण मालिकेच्या सुरुवातीलाच दाखवलेल्या दृष्यांमुळे या मालिका चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. सध्या शिवा या मालिकेत प्रेमाचे वारे वाहू लागले असून आशुतोषला त्याची स्वप्नसुंदरी भेटणार का हे स्पष्ट होणार आहे. 

मालिकेचा नवा प्रोमो सध्या प्रदर्शित करण्यात आला आहे. या आधीच्या भागामध्ये आशुतोष दिव्याला भेटायला जातो पण तेव्हा त्याची भेट शिवासोबत होते. त्यावेळी शिवा आणि आशुतोषची चांगली मैत्री देखील झाल्याचं पाहायला मिळतं. पण आता आशुतोषची भेट दिव्याशी होणार का हे आजच्या भागामध्ये समजणार आहे. 

मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित

मालिकेचा नवा प्रमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये दिव्या आईला बाहेर जाणार असल्याचं सांगते. त्यावेळी आई दिव्याला शिवाला सोबत घेऊन जाण्यास सांगते. शिवा दिव्यासोबत जाते पण तू सोबत आलीस तर पुन्हा माझा अपमान होईल, असं म्हणत दिव्या शिवाच्या गाडीवरुन उतरते आणि ती निघून जाते. दिव्या मार्केटच्या ठिकाणी पोहचल्यानंतर काही गुंड तिची छेड काढतात. त्यावेळी दिव्या त्या गुंडांच्या कानशिलात लगावते. त्याचवेळी आशुतोषला एक कानतलं सापडतं, जे दिव्याचं असतं. तेव्हा तो तिला शोधत जातो, तेव्हा दिव्या गुंडांशी दोन हात करताना त्याला दिसते. त्याचवेळी आशुतोष गुरुजींना त्याला सांगितलेली भविष्यवाणी आठवते. आशुतोषला गुरुजींनी सांगितलं असतं की, तुझ्या आयुष्यात दुर्गा येणार आहे. 

त्यामुळे आता हे कानतलं देण्याच्या निमित्ताने आशुतोष आणि दिव्याची भेट होणार का? आशुतोषच्या आयुष्यातली दुर्गा हीच असणार की दुसरी व्यक्ती दुर्गा म्हणून आशुतोषच्या आयुष्यात येणार असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडले आहेत. प्रेक्षकांच्या या प्रश्नांची उत्तरं येत्या काही काळामध्ये मिळतीलच. पण आता आशुतोषच्या मनात असलेली स्वप्नसुंदरी त्याला भेटणार की त्याला आणखी वाट पाहावी लागणार आता कळणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

ही बातमी वाचा : 

Pratishodh Zunj Astitvachi : 'प्रतिसोध - झुंज अस्तित्वाची' मालिकेत तृतीयपंथी व्यक्तिरेखा साकारणार 'हा' अभिनेता; भूतकाळाची सावली बदलणार भविष्याची दिशा

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Embed widget