एक्स्प्लोर

Aai Kuthe Kay Karte : मालिका बंद होण्याच्या चर्चांना पूर्णविराम! पण संध्याकाळचा मेन स्लॉट नाही, 'आई कुठे काय करते' येणार 'या' वेळेत भेटीला 

Aai Kuthe Kay Karte : आई कुठे काय करते ही मालिका बंद होणार नसून ती आता नव्या वेळेत प्रक्षेपित केली जाणार आहे. 

Aai Kuthe Kay Karte : 'स्टार प्रवाह' (Star Pravah) वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका आता संपणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून होत्या. सुरुवातीच्या काळात टीआरपीमध्ये अव्वल असणारी ही मालिका आता बंद होणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण आता ही मालिका बंद होणार नसल्याचं समोर आलं असून मालिका आता नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

या मालिकेला आता तब्बल पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. कुटुंबातील वाद, रुसवे, फुगवे आणि आईवर आधारित असा संपूर्ण या मालिकेचा आशय आहे. दरम्यान सध्या ही मालिका ज्या वळणावर आहे, त्यावर प्रेक्षक देखील बरेच नाराज आहे. त्यामुळे सुरुवातीला यशाच्या शिखरावर असलेली ही मालिका आता टीआरपीच्या शर्यतीत मात्र खाली उतरत चालली असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या मालिकेबाबत मोठा निर्णय देखील घेतला आहे. 

मालिकेला नाही मिळणार संध्याकाळचा मेन स्लॉट

संध्याकाळी 7.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. पण आता या मालिकेचा मेन स्लॉट काढून घेण्यात येणार आहे. आता ही मालिका थेट दुपारी प्रक्षेपित केली जाणार आहे. 18 मार्चपासून ही मालिका दुपारी 2.30 वाजता ही मालिका प्रक्षेपित होणार आहे. नुकतचं स्टार प्रवाह करुन घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता आणि या मालिकेची वेळ देखील संध्याकाळी 7.30 वाजताची आहे. त्यातच आई कुठे काय करते ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत खाली असल्यामुळे या मालिकेचा शेवट जवळ असल्याचं देखील म्हटलं जात होतं. पण आता दुपारी ही मालिका प्रदर्शित केली जाणार आहे. 

नात्यांचं महत्त्व सांगणारी नवी मालिका 'घरोघरी मातीच्या चुली'

'घरोघरी मातीच्या चुली' ही नवी मालिका संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  मालिकेच्या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हटलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे. याच आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका होय. सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे, बालकलाकार आरोही सांबरे अशी दिग्गज कलाकार मंडळी 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतून भेटीला येणार आहेत. सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने या मालिकेची निर्मिती  केली असून राहुल लिंगायत मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.

ही बातमी वाचा : 

Marathi Serials TRP : जुई गडकरीची 'ठरलं तर मग' महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका! स्टार प्रवाहच्या मालिकांना प्रेक्षकांची पसंती; झी मराठी पडलं मागे

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget