एक्स्प्लोर

Indrayani Colours Marathi Serial : कलर्स मराठीवर 'इंद्रायणी' मालिकेचा नवा प्रोमो, संदीप पाठक - अनिता दाते प्रमुख भूमिकेत, भरत जाधवही मालिकेत दिसणार?

Indrayani Colours Marathi Serial : दिग्दर्शक केदार जाधव यांची इंद्रायणी ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. टीआरपीच्या शर्यतीमध्ये ही मालिका कलर्स मराठीसाठी हुकमाचा एक्का ठरणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय.

Indrayani Colours Marathi Serial : 'कलर्स मराठी' (Colours Marathi) वाहिनीवर 'इंद्रायणी' (Indrayani) ही मालिका 25 मार्च पासून सुरु होणार आहे. केदार शिंदे यांचे दिग्दर्शन असलेली ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत संदीप पाठकसह अनिता दाते केळकर देखील झळकणार आहे. झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेनंतर राधिका पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच वाहिनीकडून करण्यात आलेल्या एका पोस्टमुळे भरत जाधवही या मालिकेत दिसणार का प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडला आहे. 

दिग्दर्शक केदार जाधव यांची इंद्रायणी ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. टीआरपीच्या शर्यतीमध्ये ही मालिका कलर्स मराठीसाठी हुकमाचा एक्का ठरणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय.  स्टार प्रवाह (Star Pravah), झी मराठी (Zee Marathi) या आघाडीच्या वाहिन्यांकडून टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी नवीन मालिकांची घोषणा करण्यात आली आहे. तर, काही नवीन मालिका सुरू झाल्या आहेत.त्यातच आता कलर्स मराठीकडून इंद्रायणी मालिका सुरु करण्यात येणार आहे. 

इंद्रायणीची नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

'कलर्स मराठी'च्या या नव्या मालिकेच्या  नव्या टीझरवर प्रेक्षकांसह मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत तुम्ही उत्तम सिनेमे दिले, आता मालिकाही उत्तमच असणार, अशा आशयाच्या कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत. 'इंद्रायणी'मालिकेच्या टीझरवर अक्षय केळकर, अमृता खानविलकर, स्पृहा जोशी, सुकन्या मोने, जयवंत वाडकर आदी कलाकारांनीदेखील शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आता या मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे या मालिकेतील प्रमुख भूमिका कोण साकारणार हे स्पष्ट झालं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by @colorsmarathi

मालिकेत भरत जाधवही दिसणार

याच दरम्यान कलर्स मराठीकडून आणखी एक पोस्ट करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी केदार शिंदे दिग्दर्शिक गलगले निघाले हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडला. त्यातच गलगले निघाले पण त्यांना नेमकं पोहचायचं कुठे? अशी एक पोस्ट वाहिनीकडून शेअर करण्यात आलीये. या पोस्टमध्ये भरत जाधव यांचा देखील फोटो आहे. या पोस्टवर कॅप्शन लिहित म्हटलं आहे की, इंद्रायणीच्या या प्रश्नावर काय असेल गलगले काकांचं उत्तर? त्यामुळे इंद्रायणी या मालिकेत भरत जाधव देखील दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by @colorsmarathi

ही बातमी वाचा : 

Tharla Tar Mag : ठरलं तर मग मालिकेत मैत्रीच्या नात्याची परीक्षा, साक्षीमुळे दुरवणार का अर्जुन - चैतन्य?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
Embed widget