Telly Masala : छावा सिनेमाच्या शूटींगदरम्यान विकी कौशलला अपघात ते अॅनिमलमधील भाभी 2 च्या बोल्ड सीनपेक्षाही मादक अदा!
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
अॅनिमलमधील बोल्ड सीनपेक्षाही मादक अदा! भाभी 2 तृप्ती डमरीच्या ब्रा लेस फोटोंचा धुमाकूळ
अॅनिमलमधील (Animal) भाभी 2 म्हणजेच अभिनेत्री तृत्पी डिमरी (Tripti Dimri) इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. अॅनिमलमधील बोल्ड सीनपेक्षाही मादक अदा तृप्तीने (Tripti Dimri) शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये दिसत आहेत. तृप्तीने (Tripti Dimri) तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ब्रा लेस फोटो शेअर केलेत. तिच्या नव्या फोटोंमुळे चाहते चांगलेच घायाळ झालेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
छावा सिनेमाच्या शूटींगदरम्यान विकी कौशलला अपघात; हाताला प्लास्टर लागल्याने चाहते चिंतेत
अभिनेता विकी कौशलला सेटवर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या छावा या सिनेमाचे शूटींग देखील सुरु आहे. छावाच्या शूटींग दरम्यान विकी कौशल (Vicky Kaushal) जखमी झाला असून त्याच्या हाताला प्लास्टर लावण्यात आले आहे. विकी कौशलकडे अनेक मोठ्या सिनेमांची ऑफर आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Ananya Panday : उर्फी जावेदला अनन्या पांडेकडून तगडं कॉम्पिटिशन, पॅरिस कल्चर वीकमध्ये नवा लूक
पॅरिसमध्ये सध्या 2024 चा पॅरिस कल्चर वीक साजरा केला जातोय. यामध्ये अभिनेत्री अनन्या पांडेने (Ananya Panday) एन्ट्री घेतली आहे. दरम्यान, तिच्या या कल्चर वीकमधील लूकने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाले आहेत. अनन्या पांडेचे (Ananya Panday) फोटो पाहिले तर तुमचीही नजर हटणार नाही. दरम्यान, अनन्याच्या नव्या लूकची तुलना उर्फी जावेदशी केली जात आहे. अनन्याने उर्फी जावेदला तगडं आव्हान उभे असल्याचे नेटकऱ्यांकडून बोलले जात आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Arti Singh Marriage : गोविंदाची भाची लवकरच अडकणार विवाहबंधनात; कृष्णा अभिषेकने दिली माहिती
अभिनेता आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकने (Krushna Abhishek) त्याची बहिण अभिनेत्री आरती सिंह (Arti Singh) हिच्या विवाहाबाबत माहिती दिली आहे. 'बिग बॉस 13'ची स्पर्धक आरती लवकरच तिचा बॉयफ्रेंड दीपक चौहान याच्याशी विवाह करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. आता एप्रिल किंवा मे महिन्यात ते विवाहबंधनात अडकतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दोघांच्या विवाहाच्या बातम्यांवर कृष्णा अभिषेकने शिक्कामोर्तब केलाय.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
सोनाक्षीच्या मॅनेजरसह 3 जण न्यायालयाकडून फरार घोषित, मालमत्ता जप्त करण्याचे आदेश
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिच्या मॅनेजरला न्यायालयाने फरार घोषित केले आहे. मुरादाबाद न्यायालयाने मॅनेजरसह तिघांना फरार घोषित करत त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण 2019 मधील आहे. मुरादाबादमधील एका इव्हेंट कंपनीचे संचालक प्रमोद शर्मा याने सोनाक्षी सिन्हाच्या (Sonakshi Sinha) कंपनी विरोधात कटघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात सोनाक्षी सिन्हाला (Sonakshi Sinha) उच्च न्यायालयाकडून 28 फेब्रुवारीपर्यंत स्टे देण्यात आला होता.