Vicky Kaushal Injured : छावा सिनेमाच्या शूटींगदरम्यान विकी कौशलला अपघात; हाताला प्लास्टर लागल्याने चाहते चिंतेत
Vicky Kaushal Injured : बॉलिवूड अभिनेत्यांना अनेकदा सिनेमांमध्ये स्टंट करावे लागतात. सिनेमांच्या शूटींगदरम्यान दुखापत होणे, सध्या कॉमन मानले जाते. यापूर्वी अनेक अभिनेत्यांना शूटींग दरम्यान दुखापत झाली आहे. आता अभिनेता विकी कौशलला सेटवर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

Vicky Kaushal Injured : बॉलिवूड अभिनेत्यांना (Vicky Kaushal) अनेकदा सिनेमांमध्ये स्टंट करावे लागतात. सिनेमांच्या शूटींगदरम्यान दुखापत होणे, सध्या कॉमन मानले जाते. यापूर्वी अनेक अभिनेत्यांना शूटींग दरम्यान दुखापत झाली आहे. आता अभिनेता विकी कौशलला सेटवर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. विकी कौशलकडे अनेक मोठ्या सिनेमांची ऑफर आहे. त्याच्या छावा या सिनेमाचे शूटींग देखील सुरु आहे. छावाच्या शूटींग दरम्यान विकी कौशल (Vicky Kaushal) जखमी झाला असून त्याच्या हाताला प्लास्टर लावण्यात आले आहे.
'जरा हटके जरा बचके' या सिनेमानंतर विकी कौशलने पुन्हा लक्ष्मण उतेकरसोबत काम केले आहे. दुर्दैवाने याच सेटवर तो जखमी झाला आहे. विकी कौशलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये विकीच्या (Vicky Kaushal) हाताला प्लास्टर लावण्यात आला असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये विकी (Vicky Kaushal) त्याच्या कारमधून बाहेर पडत घराकडे जात आहे. विकी पुढील काही आठवडे आराम करणार असल्याचे बोलले जात आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर तो पुन्हा एकदा शूटींग सुरु करेन. विकीचा जखमी अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते चिंतेत पडले आहेत. सोशल मीडियावरुन चाहते विकीचा व्हिडीओ पाहून चिंता व्यक्त करत आहेत.
View this post on Instagram
विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत
अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) 'छावा' या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात अभिनेत्री रश्मिका मंदाना येसूबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात औरंगजेबाची भूमिकाही महत्वाची असणार आहे. त्यामुळे औरंगजेबाच्या भूमिकेवर जोर देण्यात आलाय.
रश्मिकाची इन्स्टाग्राम पोस्ट
रश्मिकाने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून सिनेमाबाबत भाष्य केलं आहे. लक्ष्मण उतेकरच्या छावा या सिनेमाची शूटींग पूर्ण केली असल्याची माहिती रश्मिकाने शेअर केली होती. "दोन दिवसांपूर्वी माझे छावा सिनामाचे शूटींग पूर्ण झाले. मला हे स्वीकारायला दोन दिवस लागले. हा सिनेमा सर्वांना पंसतीस पडेल.
क्रू, कलाकार, सिनेमाची कथा, कपडे, सेट , सीन, संवाद..सर्वकाही! हे प्रेम आहे."
Anant-Radhika Wedding: अनंत अंबानी-राधिका मंर्चंटच्या लग्नात सुरांची मैफिल सजणार, बॉलिवूडचे 'हे' दिग्गज गायक करणार लाईव्ह परफॉर्मन्स
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

