Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ॲक्शन-ड्रामा 'बटवारा: 1947'ने किती कोटींची ओपनिंग केली, याचे आकडेही समोर आले आहेत.

Box office collection: 15 ऑगस्ट हा सिनेप्रेमींसाठी यंदा बराच कन्फ्युजन निर्माण करणारा ठरला आहे. कारण यावेळी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या पसंतीचे दोन मोठे स्टार आमनेसामने आले आहेत. एका बाजूला सनी देओल 'बटवारा 1947' (Batwara 1947) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला, तर दुसरीकडे इमरान हाश्मी 'आवारापन 2' ( Aawarapan 2) घेऊन बॉक्स ऑफिसच्या मैदानात उतरला. 'आवारापन 2' समोर सनी देओलच्या ॲक्शन-ड्रामा 'बटवारा: 1947'ने किती कोटींची ओपनिंग केली, याचे आकडेही समोर आले आहेत.
'बटवारा 1947'ला मिळाली इतक्या कोटींची ओपनिंग
सिनेमागृहात प्रदर्शित होण्यापूर्वी 'बटवारा 1947'ने ब्लॉक सीट्स वगळता ॲडव्हान्स बुकिंगमधून जवळपास 1.76 कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपट पहिल्या शुक्रवारी 10 कोटी रुपयांपर्यंत कमाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, सनी देओलच्या चित्रपटाचे समोर आलेले आकडे पाहता निर्मात्यांना मोठा धक्का बसू शकतो.
'बटवारा 1947' ने 8721 शोमधून जगभरात 8.34 कोटी (भारतातील एकूण कमाई: 6.84 कोटी , परदेशात: 1.50 कोटी ) एकूण आणि 5.75 कोटी निव्वळ कमाई केली आहे .
अवारपन 2' ने 9,033 शोमधून जगभरात एकूण ₹27.20 कोटी (भारतातील एकूण कमाई: 25.20 कोटी , परदेशात: ₹2 कोटी ) आणि निव्वळ 21 कोटींची कमाई केली आहे .
ओव्हर इमोशनल कथा आणि 'आवारापन 2'मुळे बिघडला खेळ?
'बंटवारा 1947'चे ग्रॉस कलेक्शनही समोर आले असून ते जवळपास 6.84 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. सनी देओल, प्रीती झिंटा आणि शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दोन कारणांमुळे फटका बसल्याचे मानले जात आहे.
पहिले कारण म्हणजे चित्रपटाची अतिशय भावनिक कथा, जी कथानकाला मूळ विषयापासून काही प्रमाणात भरकटवते. तर दुसरे मोठे कारण म्हणजे 'आवारापन 2'सोबत झालेली टक्कर.
इमरान हाश्मीचा 'आवारापन' हा बॉलिवूडमधील कल्ट क्लासिक चित्रपट मानला जातो. 2007 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती. आता तब्बल 19 वर्षांनंतर इमरान हाश्मी 'शिवम पंडित'च्या भूमिकेत परतला आहे. त्यामुळे त्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. याचा थेट फटका राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'बंटवारा 1947'ला बसल्याचे दिसत आहे. मात्र, हे चित्रपटाचे सुरुवातीचे बॉक्स ऑफिस आकडे आहेत. पहिल्या वीकेंडनंतरच सनी देओलचा 'बंटवारा 1947' हिट ठरणार की फ्लॉप, याचा अंदाज अधिक स्पष्ट होईल.






















