The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो' साठी कपिल घेतो एवढे मानधन; जाणून घ्या शोबद्दलच्या खास गोष्टी
कपिल शर्मासोबतच भारती सिंह, कीकू शारदा, कृष्णा अभिषेक आणि चंदन प्रभाकर हे कलाकार देखील या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात.

Kapil Sharma Show : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) ला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. कपिल शर्मा (Kapil Sharma) सोबतच भारती सिंह, कीकू शारदा, कृष्णा अभिषेक आणि चंदन प्रभाकर हे कलाकार देखील या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. अनेकांना असे वाटते की हा शो कपिलच या शोचा दिग्दर्शक आहे. कपिल या शोसाठी किती मानधन घेतो? असाही प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडत असेल. जाणून घेऊयात या शोचे डिरेक्टर कोण आहेत आणि या शोच्या एका एपिसोडसाठी कपिल किती मानधन घेतो.
रिपोर्टनुसार, 'द कपिल शर्मा शो' या शोचे दिग्दर्शन भारत कुकरेती हे करतात. तसेच अभिनेता सलमान खान या शोचा निर्माता आहे. 23 एप्रिल 2016 रोजी द कपिल शर्मा शोची सुरूवात झाली. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या शोमध्ये येऊन त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करतात. 'द कपिल शर्मा शो' च्या एका एपिसोडसाठी कपिल 50 लाख रूपये मानधन घेतो. म्हणजेच तो एका विकेंडसाठी 1 कोटी रूपये मानधन घेतो.
View this post on Instagram
'द कपिल शर्मा शो' या शोमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येत असतात. तसेच अर्चना पूरन सिंह या शोमध्ये परिक्षकाची भूमिका पार पाडतात. कपिलच्या कॉमिक टायमिंग आणि जोक्समुळे या शोला प्रेक्षकांची पसंती मिळते.
संबंधित बातम्या























