एक्स्प्लोर
Advertisement
ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं निधन
ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे आज (शुक्रवार) सकाळी पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले.
पुणे : ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे आज (शुक्रवार) सकाळी पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
आपल्या दिग्दर्शनातून त्यांनी नाटकांमध्ये कायमच स्वत:ची छाप सोडली. प्रायोगिक नाटकांसह व्यावसायिक नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. त्यांनी दिग्दर्शित केलेलं 'मोरुची मावशी' हे नाटक सर्वाधिक गाजलं. यासोबतच राजाचा खेळ, उघडले स्वर्गाचे दार, कवडी चुंबक आदी अनेक नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं.
कोल्हटकरांनी प्रायोगिक नाटकांमधून नेपथ्थकार म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर ते हळूहळू दिग्दर्शनाकडे वळाले. प्रायोगिक नाटकानंतर त्यांनी बऱ्याच व्यावसायिक नाटकांमध्ये नेपथ्थ, प्रकाशयोजना आणि दिग्दर्शक अशा भूमिका पार पाडल्या. कोल्हटकरांनी विजया मेहता यांच्या नाटकांचंही नेपथ्य आणि प्रकाश योजना केली होती.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी दिलीप कोल्हटकरांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांची पुण्यात क्षुल्लक कारणावरुन त्यांच्या नोकराने हत्या केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement